फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीचा दुसरा दिवस : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या दिनी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीची सुरुवात केली आहे. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनचां विकेट घेऊन दुसऱ्या दिनाचा शुभारंभ केला. कालच्या शेवटच्या चेंडूवर कॅप्टन जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यामध्ये मैदानावर बाचाबाची पाहायला मिळाली यावेळी सॅम कॉन्स्टासने जसप्रीतला चॅलेंज केले होते, त्यानंतर कॅप्टनने त्याचे चलेंज स्वीकारत त्याच चेंडूवर ख्वाजाला बाहेरचा रस्ता दाखवला. यावेळी संपूर्ण भारतीय संघाने केलेल्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या इनिंगच्या २९ ओव्हर खेळल्या आहेत. यामध्ये त्यांनी १०१ धावा करत ५ विकेट्स गमावले आहेत. सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि कांगारूंच्या संघाचा विस्फोटक फलंदाज ट्रविस हेडला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॉन्स्टासने संघासाठी २३ धावा केल्या आहे, तर उस्मान ख्वाजाने संघासाठी फक्त २ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ सुरुवातीला चांगल्या लयीत दिसला पण तो फार मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने ३३ धावा केल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याचा बळी घेतला.
हेडने ४ धावा केल्या आणि मोहम्मद सिराजच्या हाती त्याची विकेट लागली. मार्नस लॅबुशेनने संघासाठी फक्त २ धावा करून जसप्रीत बुमराहने त्याला पॅव्हेलियन चां रस्ता दाखवला. भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर जसप्रीत बुमरहने संघासाठी दोन विकेट्स घेतले आहेत तर मोहम्मद सिराजच्या हाती दोन विकेट्स लागले आहेत. प्रसिद्ध कृष्णाच्या हाती एक विकेट्स लागला आहे.
Lunch on Day 2 in Sydney!
Four wickets in the morning session for #TeamIndia 🙌
Australia 101/5, trail by 84 runs
Scorecard – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/ccce5vjdB9
— BCCI (@BCCI) January 4, 2025
भारताच्या संघाचा या सिडनी कसोटी सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माला संघाबाहेर ठेवून जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या टीम इंडियाचा सर्वात धक्कादायक निर्णय होता. टीम इंडियाने रोहित शर्माच्या जागेवर शुभमन गिलका प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले आणि आकाशदीप जखमी असल्यामुळे त्याच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णा संघामध्ये स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध कृष्णा संघामध्ये चांगली सुरुवात करून २ विकेट्स नावावर केले आहेत.
पहिला दिवस संपण्यापूर्वी बुमराह गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा असताना कोन्स्टासने त्याला छेडले. बुमराह शांत नव्हता. त्यांनीही कोंतास तोंडी उत्तर दिले. मैदानावरील पंचांनी हस्तक्षेप करून ते थांबवले तेव्हा दोघांमधील संभाषण वाढतच होते. पुढच्या चेंडूवर, जो दिवसाचा शेवटचा चेंडू होता, बुमराहने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि कोन्स्टासकडे पाहून उत्तर दिले. ख्वाजाने केलेल्या चुकीचे परिणाम त्याला भोगावे लागतील हे कोन्स्टासला माहीत होते.