फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
India vs Australia Toss Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना सुरु होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आजचा चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. याआधी सामन्याचे नाणेफेक झाले आहे या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. मागील सामन्यांमध्ये भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ठरला होता.
भारतीय संघामध्ये एकही बदल करण्यात आला नाही. यामध्ये आता भारताचे चार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे मैदानात दिसतील तर वेगवान गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शामी असणार आहेत. आज विराट कोहलीच्या कामगिरीवर त्याचबरोबर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने संघासाठी ८१ धावांची खेळी संघ अडचणींमध्ये असताना खेळला. त्याचबरोबर हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केले. अक्षर पटेलने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ४४ धावांनी टीम इंडियाने किवी संघाला धूळ चारली. भारताच्या संघाने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानमध्ये सर्व सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने एक सामना इंग्लंडविरुद्ध जिंकला होता, तर दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
CT 2025. Australia won the toss and elected to bat. https://t.co/HYAJl7biEo #INDvAUS #ChampionsTrophy #SemiFinal
— BCCI (@BCCI) March 4, 2025
मागील सामन्यांमध्ये भारताच्या संघाने चार फिरकी गोलंदाजाना खेळवले होते. यामध्ये कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संधी मिळाली होती. तर मोहम्मद शामी आणि हार्दिक पंड्या हे दोघे वेगवान गोलंदाजांची भूमिका साकारतील.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा