फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
India vs Australia Semifinal : भारतीय संघाची आज खरी परीक्षा दुबईच्या मैदानावर असणार आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडिया चार फिरकी गोलंदाजांसोबत खेळली आणि संघाने ४४ धावांनी विजय मिळवला. यामध्ये भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली होती. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने संघासाठी कमालीची कामगिरी करून संघासाठी ५ विकेट्स घेतले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेहमीच फिरकी गोलंदाजांना पसंती देण्यात आली आहे. हे अलिकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या लीग स्टेज सामन्यातही दिसून आले.
ऑस्ट्रेलियाचा संघ हा क्रिकेट विश्वामध्ये एक बलाढ्य संघ आहे त्याने अनेक मोठ्या संघांवर मोठ्या सामन्यांमध्ये मात दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला हल्ल्यात घेणे म्हणजेच मूर्खपणा! अशा परिस्थितीत आजच्या सामन्यांमध्ये दुबईमध्ये कोण कोणावर वर्चस्व गाजवते हे पाहणे महत्त्वाचे आहे. आजच्या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांमध्ये भारताच्या संघाने चार फिरकी खेळाडूंना मैदानात उतरवले होते. यावेळी सुद्धा भारताचा कर्णधार रोहित शर्मा चार गुगली गोलंदाजांना मैदानामध्ये उतरवू शकतो. टीम इंडियाकडे वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवसारखे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. गेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीकडून भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा असतील. जगभरातील फलंदाजांना वरुणला समजून घेणे सध्या कठीण आहे कारण त्याच्याकडे ७ प्रकारचे व्हेरिएशन आहेत.
Skipper Rohit Sharma opens up on India’s game plan for Australia in the much-anticipated #ChampionsTrophy semi-final 👊
More 👉 https://t.co/tujmeWEtZz pic.twitter.com/pLLaT9y1tw
— ICC (@ICC) March 4, 2025
मागच्या सामन्यांमध्ये हर्षित राणाला संघामधून बाहेर ठेवण्यात आले आणि त्याच्या जागेवर वरूण चक्रवर्तीला संघामध्ये स्थान मिळाले होते. भारतासाठी कुलदीप यादव हा महत्वाचा गोलंदाज आहे. दुबईच्या स्पिन ट्रॅकवरही कुलदीप धोकादायक ठरू शकतो. याशिवाय भारतीय संघात अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजासारखे डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. ते फलंदाजी तर उत्तम करतातच गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी अविश्वनीय कामगिरी केली आहे.
भारताच्या संघासाठी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पा हा धोकादायक ठरू शकतो. त्याने त्याच्या संघासाठी अमूल्य गोलंदाजी केली आहे बरेच सामने त्याने संघाला जिंकवून दिले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेल देखील आहे. मॅक्सवेल हा पार्टटाइमर आहे पण त्याने अनेक मोठ्या सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. दुबईच्या स्लो विकेटवर संघाची लेग स्पिन गोलंदाजी टीम इंडियासाठी समस्या निर्माण करू शकते.