फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराह-सॅम कॉन्स्टास : ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासने त्याचा आज डेब्यू सामना खेळाला यामध्ये त्याने अर्धशतक झळकावत सर्वानाच चकित केले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामन्याची सुरुवात आजपासून झाली आहे. यामध्ये आज पहिल्या दिनापासूनच ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची भीती फलंदाजांमध्ये इतकी आहे की समोरचा फलंदाज बुमराह समोर चौकार मारणे विसरून जा, फलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध धावा काढण्यास उत्सुक होत नाही.
ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय पदार्पणवीर सॅम कॉन्स्टासला जसप्रीत बुमराहची भीती नव्हती. यामुळेच जसप्रीत बुमराहचा वर्षानुवर्षे चाललेला सिलसिला त्याने मोडला आहे. ३ वर्षे आणि ४४०० हून अधिक चेंडूंनंतर, जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एकाही फलंदाजाने षटकार मारलेला नाही. जसप्रीत बुमराह विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये, एका फलंदाजाने ४४८३ चेंडूत, ११४५ दिवस म्हणजे ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर पहिल्यांदा षटकार ठोकला. जसप्रीत बुमराहविरुद्ध १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने एक नाही तर दोन षटकार ठोकले. शेवटच्या वेळी २०२१ मध्ये लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार मारला होता. इतकेच नाही तर २०१८ नंतर पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाने जसप्रीत बुमराहविरुद्ध एका डावात दोन षटकार ठोकले. जोस बटलरने २०१८ मध्ये हे केले होते.
AUS vs IND : मेलबर्नमध्ये सॅम कोन्स्टासने मोडला डेब्यू सामन्यात 95 वर्ष जुना विक्रम!
शेवटच्या वेळी ज्या फलंदाजाने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार मारला होता, तोही ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होता. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ षटकार न मारण्याचा विक्रम मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. २०११ ते २०१६ या काळात त्याने ९१५.५ षटकात एकही षटकार मारला नाही. त्याचवेळी जेम्स अँडरसनविरुद्ध ७८१.२ षटकांत एकाही फलंदाजाने षटकार मारला नव्हता. जसप्रीत बुमराह ७४६.१ षटकांनंतर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
क्विंटन डी कॉकने मिचेल स्टार्कचा षटकार न मारण्याचा तर यशस्वी जैस्वालने षटकार न मारण्याची अँडरसनची मालिका खंडित केली. आता सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध हा करिष्मा केला आहे. सामन्यापूर्वीच त्याने बुमराहसाठी प्लॅन असल्याचे सांगितले होते.
एबी डिव्हिलियर्स – १ षटकार – (केपटाऊन कसोटी २०१८)
आदिल रशीद – १ षटकार – (नॉटिंगहॅम कसोटी २०१८)
मोईन अली – १ षटकार – (साउथम्प्टन कसोटी २०१८)
जोस बटलर – २ षटकार – (केनिंग्टन ओव्हल कसोटी २०१८)
नॅथन लिऑन – १ षटकार – (मेलबर्न कसोटी २०२०)
कॅमेरॉन ग्रीन – १ षटकार – (सिडनी कसोटी २०२१)
सॅम कॉन्स्टास – २ षटकार – (मेलबर्न कसोटी २०२४)
19 वर्षीय सॅम कॉन्स्टासने अवघ्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर रवींद्र जडेजाने सॅम कॉन्स्टासला ६० धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले. सॅम कॉन्स्टासने १९ वर्षे ८५ दिवस वयात पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सॅम कॉन्स्टन्स हा चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी टीम इंडियाकडे सोपवली.