
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या शेवटच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेमध्ये पाचवा सामना आज खेळवला जात आहे. हा सामना निर्णायक आहे. कारण भारताचा संघ सध्या मालिकेमध्ये आघाडीवर आहे तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आज मैदानात उतरणार आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे, या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी एकत्र आले आहेत.
आजच्या मालिकेच्या पाचव्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघामध्ये आज एक बदल करण्यात आला आहे. मागील सामन्यामध्ये अक्षर पटेल आणि वाॅशिग्टन सुंदर त्याचबरोबर शिवम दुबे यांनी कमालीची कामगिरी केली होती. अक्षर पटेल याने फक्त गोलंदाजींमध्येच नाही तर फलंदाजीमध्ये देखील जोर दाखवला होता.
🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨 Australian skipper Mitchell Marsh won the toss and opted to bowl first in Brisbane! 🇦🇺🪙#AUSvIND #T20Is #Sportskeeda pic.twitter.com/QyjidEhCPV — Sportskeeda (@Sportskeeda) November 8, 2025
भारताच्या संघाने आजच्या सामन्यामध्ये आज एक बदल केला आहे, या सामन्यामध्ये तिलक वर्मा याला बाहेर केले आणि रिंकू सिंहला संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे. आज शिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह हे कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरले. भारताचा संघ पहिले फलंदाजी करणार आहे त्यामुळे अभिषेक शर्मा चाहत्यांची नजर असणार आहे.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झांपा.