Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS ODI: कपिल देव आणि मोहम्मद शमी यांची दहशत! ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भरली होती धास्ती; वाचा सविस्तर 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन एकदिवसीय  सामन्यांची मलिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कपिल देव आणि मोहम्मद शमी यांनी शानदार कामगिरी करून आपली छाप पाडली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 18, 2025 | 02:27 PM
IND vs AUS ODI: Kapil Dev and Mohammed Shami's terror! Australian batsmen were full of fear; Read in detail

IND vs AUS ODI: Kapil Dev and Mohammed Shami's terror! Australian batsmen were full of fear; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जाणार 
  • १९ ऑक्टोबरला पहिला सामना होणार आहे
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध कपिल देव आणि शमी यांची प्रभावी कामगिरी 
IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका १९ ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला आहे. पहिला सामना पर्थ येथे सुरू होणार आहे. या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, दोन्ही देशांच्या खेळाडूंच्या विक्रमांबद्दल आता चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंची फलंदाजीची कामगिरी प्रभावी राहिली आहे, तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते. तथापि, कपिल देव आणि मोहम्मद शमी या दोन दिग्गज भारतीय गोलंदाजांनी वारंवार ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहला एकदिवसीय सामना १९८० मध्ये खेळला गेला. दोन्ही देशांदरम्यान आतपर्यंत एकूण १५२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये फक्त पाच गोलंदाजांनी ४० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. यामध्ये तीन ऑस्ट्रेलियन आणि दोन भारतीय गोलंदाजांचा समावेश असून त्यांना या ऐतिहासिक स्पर्धेत सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून गणले जाते.

हेही वाचा : Ranji Trophy 2025 : रिंकू सिंगने झळकावले शतक! उत्तर प्रदेशला संकटातून काढले बाहेर, वाचा सविस्तर

ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीचा नंबर पहिला

ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली विकेट्स घेण्याच्या बाबतीत पहिल्या नंबरवर आहे. त्याने २००० ते २०१२ दरम्यान भारताविरुद्ध ३२ सामन्यांमध्ये ३० डावांमध्ये २५७.१ षटके टाकली आहेत. यामध्ये त्याने २१ च्या सरासरीने ५५ विकेट्स चटकावल्या आहेत. लीने भारताविरुद्ध चार वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी करण्याची किमया साधून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.

कपिल देव भारताच्या यादीत अव्वल स्थानी

भारताच्या दिग्गज माजी गोलंदाज कपिल देव यांनी १९८० ते १९९४ दरम्यान ४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३८.४ षटके टाकली आणि ४५ विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देवची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी सातत्याने प्रभावी राहिली होती आणि त्यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा विरोधी फलंदाजांना चकवले आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्ध ४३/५ अशी राहिली होती, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्यांची  सातत्यपूर्ण कामगिरी त्याला या यादीत अव्वल स्थान प्राप्त करून देते.

मिचेल, वॉ यांचाही या यादीत समावेश

२००६ ते २०१५ दरम्यान भारताविरुद्ध मिचेल जॉन्सनने २२०.३ षटके टाकली आहेत. या मध्ये त्याने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या वेग आणि उसळीने अनेक वेळा भारतीय फलंदाज चांगलेच अडचणीत सापडले आहेत. चौथ्या क्रमांकावर स्टीव्ह वॉचे देखील नाव आहे, जो सामान्यतः फलंदाज म्हणून ओळखत असे परंतु त्याने भारताविरुद्ध ५३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५७.३ षटके टाकून त्याने या दरम्यान  ४३ विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शमीची खास कामगिरी

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, त्याने २०१३ ते २०२५ दरम्यान २१५.४ षटके टाकून ४२ विकेट्स काढल्या आहेत.  शमीची सर्वोत्तम कामगिरी ५१/५  ही राहिली होती, जी त्याच्या धारदार गोलंदाजीचा एक महत्वाचा पुरावा आहे.

हेही वाचा : India vs Australia Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्थान आणि वेळ बदलली, वाचा मॅचची सविस्तर माहिती

 

Web Title: Ind vs aus odi kapil dev and mohammed shami terrorise australian batsmen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Kapil Dev
  • Mohammad Shami

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.