फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९ ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनावर असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर हे दोन्ही दिग्गज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळतील. कोहली आणि रोहितने कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते फक्त ५० षटकांच्या स्वरूपात चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतील.
या दौऱ्यापूर्वी, रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते आणि कसोटी मालिकेनंतर, शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. रोहित आणि कोहली यावेळी नवीन कर्णधाराखाली खेळताना दिसतील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा काही तासांमध्ये सुरु होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना रविवार, १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियातील पर्थ स्टेडियमवर रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार – शुभमन गिल आणि मिशेल मार्श – अर्धा तास आधी, म्हणजे सकाळी ८:३० वाजता टॉससाठी मैदानात उतरतील.
भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. त्याचबरोबर भारतीय चाहते जिओहॉटस्टारवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना ऑनलाइन पाहू शकतात. जर तुम्हाला हा सामना फ्री पाहायचा असेल तर तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना मोफत पाहू शकता.
Smiles, swagger & style – Team India bring their A game for a fun photoshoot before the Toughest Rivalry begins Down Under! 💥📸#AUSvIND 👉 1st ODI | Sun, 19th Oct, 8 AM pic.twitter.com/5y2IJz6Ne8 — Star Sports (@StarSportsIndia) October 18, 2025