IND VS AUS: Australia is not doing well now! 'Ro-Ko' sweats on the field while practicing; Watch Video
India vs Australia ODI series : शुभमनगिलच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल सांगायचे झाले तर, एकदिवसीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने या मालिकेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा : आनंदाची बातमी! 2025 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार, ‘या’ शहराला मिळाला यजमानपदाचा मान
भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बऱ्याच काळानंतर मैदानात उतरणार आहेत. चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियातून या दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांची मने जिंकण्यात आली आहेत. खरं तर, रोहित आणि विराट १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करत आहेत. नेटमध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते सराव करताना दिसून येत आहेत.
THE MUCH AWAITED MOMENT 😍 – Rohit Sharma & Virat Kohli practising together for the ODI series. [RevSportz] pic.twitter.com/JGzkqgFXfU — Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2025
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व केल्यानंतर त्यांनी या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती. त्यानंतर, नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीपूर्वी त्यांनी कसोटी फॉरमॅटमधून देखील निवृत्ती पत्करली होती. आता, ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच सक्रिय राहणार आहे. त्यांनी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये त्यांचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यामुळे, ७-८ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर हे दोन्ही अनुभवी खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय दिग्गज खेळाडूंची ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय सामन्यांमधील कामगिरी खूप प्रभावी राहिली आहे. रोहित शर्माने ३० सामन्यांमध्ये ५३.१२ च्या सरासरीने १३२८ धावा फटकावल्या आहेत. तर विराट कोहलीने २९ सामन्यांमध्ये ५१.०४ च्या सरासरीने १३२७ धावा केल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी पाच शतके झळकवली आहेत.
हेही वाचा : Eng vs NZ T20 series: इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित! न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).