
फोटो सौजन्य - icc
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऐतिहासिक सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ऐतिहासिक विजय नावावर केला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कमालीची कामगीरी केली. महिला विश्वचषक २०२५ चा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात भारतीय संघाने त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग देखील पूर्ण केला.
भारताच्या संघाने हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रोड्रिक्स याच्यामध्ये झालेल्या भागीदारीने संघाला विजयापर्यत नेले. विजयानंतर हरमनप्रीत कौर खूप भावुक झाली. तिने सामन्यानंतर एक महत्त्वपूर्ण विधान केले.
सामन्यानंतर हरमनप्रीत कौरने एक मोठे विधान केले, ती म्हणाली, “हो, मला खरोखर अभिमान आहे. माझ्याकडे स्वतःला व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, पण मला खूप छान वाटत आहे. यावेळी तुम्ही आमच्यासोबत खेळत आहात, आम्ही वर्षानुवर्षे खूप मेहनत घेतली आहे. हे आश्चर्यकारक आहे. मला विश्वास बसत नाही. मला खरोखर अभिमान आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक खेळाडू कोणताही सामना, कधीही, कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतो. या स्पर्धेत आम्ही काही चुका केल्या, पण शेवटी, आम्ही आमच्या चुकांमधून शिकत आहोत, आणि आजचा दिवस होता जेव्हा आम्हाला सर्वकाही आमच्या बाजूने करायचे होते, काहीही झाले तरी.”
जेमिमाला विजयाची हिरो म्हणत त्यांनी सांगितले की जेमिमा नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करू इच्छिते कारण ती नेहमीच खूप विचारपूर्वक खेळते आणि जबाबदारी घेऊ इच्छिते आणि आम्हाला नेहमीच तिच्यावर विश्वास आहे आणि आज तिची खेळी खूप खास होती. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ४८.३ षटकांत ३४१ धावा करून सामना जिंकला. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने १२७ आणि हरमनप्रीत कौरने ८९ धावा केल्या.
उपांत्य फेरी जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेने साखळी टप्प्यात भारताचा पराभव केला. २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले होते, जिथे दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा ३ गडी राखून पराभव केला होता.