
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs Australia Toss Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना हा कॉरोबोरी ग्रुप ओव्हल, मनुका येथे खेळवला जात आहे. या मालिकेमध्ये पाच सामन्यांचे आयोजन करण्यात आले. भारतीय युवा संघ या मालिकेमध्ये एकदिवसीय मालिकेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यात उतरेल. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ मैदानात उतरेल तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. या सामन्यांचे नाणेफेक पार पडले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या पहिल्या सामन्यामधील प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरताना दिसतील. त्याचबरोबर विकेटकिपरच्या भुमिकेत संजु सॅमसन खेळताना दिसणार आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bat first in Canberra. Updates ▶️ https://t.co/VE4FvHCa1u #AUSvIND | #1stT20I pic.twitter.com/tfUulkeLDZ — BCCI (@BCCI) October 29, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधून भारताचा नितीश कुमार रेड्डी बाहेर पडला आहे. अॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या डाव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून बरा होत असलेल्या या अष्टपैलू खेळाडूने मानेच्या दुखापतीची तक्रार केली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार मिशेल मार्श म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. ही पृष्ठभाग फलंदाजीसाठी चांगली आहे, म्हणून आम्ही त्यावर पाठलाग करण्याचा विचार करत आहोत. भारत एक मजबूत संघ आहे आणि आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.”
सुर्या म्हणाला की, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. आम्ही त्यावर चर्चा केली आणि येथील पृष्ठभाग दिवसाच्या अखेरीस मंदावत असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे आणि त्यांच्यावर दबाव आणायचा आहे. संघ निवडणे खूप कठीण आहे,” असे नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाले.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिलक वर्मा, संजू सॅमसन ( यष्टीरक्षक ), शिवम दुबे , अक्षर पटेल, हर्षित राणा , कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंगलिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन, जोश हेझलवुड.