फोटो सौजन्य - JioHotstar Reality
भारतीय अंडर-१९ संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये संघ यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा बीसीसीआयने आधीच केली आहे. या अंडर-१९ दौऱ्यावर, सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर असेल, ज्याने यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात प्रभावी फलंदाजी कामगिरी केली होती. भारतीय संघाचे नेतृत्व आयुष म्हात्रे करताना दिसणार आहे. मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने यूवा खेळाडूंना मार्गदर्शन देखील केले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघादरम्यान युवा एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त, युवा एकदिवसीय मालिकेत आरएस अम्ब्रिस आणि विहान मल्होत्राच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल, या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी दाखवली होती. १८ वर्षीय विकेटकीपर फलंदाज सायमन बज युवा एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व सांभाळेल.
Rohit Sharma नव्या भूमिकेत! Vaibhav Suryavanshi आणि Ayush Mhatre याच्यासोबत दिसला खास ठिकाणी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याच्या थेट प्रक्षेपणाबाबत, भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकतात. सामना सकाळी १०:०० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल आणि टॉस सकाळी ९:३० वाजता होईल. सामना जिओहॉटस्टार अॅपवर देखील थेट प्रक्षेपित केला जाईल, जिथे चाहते लॉग इन करून सामना पाहू शकतात.
भारत – आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल कुमार पटेल, अनमोल कुमार पटेल, अनमोल कुमार पटेल, डी. उद्धव मोहन, अमन चौहान.
राखीव खेळाडू: युधाजित गुहा, लक्ष्मण, बीके किशोर, अलंकृत रापोले, अर्णव बुग्गा.
ऑस्ट्रेलिया – सायमन बज, अॅलेक्स टर्नर, स्टीव्ह होगन, विल मालजाचुक, यश देशमुख, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, चार्ल्स लॅचमंड, बेन गॉर्डन, विल बायरम, केसी बार्टन, अॅलेक्स ली यंग, जेडेन ड्रेपर.
राखीव खेळाडू – जेड हॉलिक, टॉम पॅडिंग्टन, ज्युलियन ऑसबोर्न.