
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना कॅनबेरा येथे होणार आहे. या मालिकेत पाच सामने होणार आहेत, या मालिकेचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाला एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि आता सर्वांनाच काळजी आहे की त्याच कारणामुळे T20 मालिका देखील रद्द होईल. हवामानाची एक मोठी अपडेट आली आहे आणि चाहते नक्कीच आनंदी होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना कॅनबेरा येथे होत आहे. हवामान अंदाजानुसार, दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांमधील सामना ऑस्ट्रेलियन वेळेनुसार संध्याकाळी ७:१५ वाजता सुरू होईल. कॅनबेरामध्ये सकाळी पावसाची शक्यता ६०% आहे. संध्याकाळी तापमान ११ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, ८९% आकाश ढगांनी झाकलेले असेल. रात्री २५% पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यावर पावसाची शक्यता आहे, परंतु पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता नाही.
IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग ११: ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, जोश फिलिप, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट/शॉन अॅबॉट, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल. सध्या दोघेही आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल आहेत आणि त्यांना जोश हेझलवूडचा सामना करताना पाहणे मनोरंजक असेल. शुभमन गिलची एकदिवसीय मालिका खराब राहिली आणि सर्वांना आशा आहे की तो टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करेल. सूर्याचे २०२५ हे वर्ष फलंदाजीसह फारसे चांगले गेले नाही आणि तोही पहिल्या सामन्यात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल.