Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN : टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीत पोहोचली! कॅप्टन सूर्याच्या नावाचे लागले नारे

आता ९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा सामना रंगणार आहे. आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दुसरा सामना मंगळवारी होणार आहे ज्यासाठी टीम इंडिया येथे पोहोचली आहे. राजधानीत पोहोचल्यावर टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 08, 2024 | 02:15 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या T20 मालिका सुरु आहे, टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध ३ T20 सामान्यांची मालिका खेळणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी भारताचा मालिकेचा पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध झाला. या सामन्यात भारताच्या संघाने सहज विजय मिळवून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी कमाल करून बांग्लादेशला १२७ धावांवर रोखले. त्यानंतर भारताच्या संघाने १२ षटकामध्ये लक्ष्य पूर्ण केले. आता ९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा सामना रंगणार आहे.

आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दुसरा सामना मंगळवारी होणार आहे ज्यासाठी टीम इंडिया येथे पोहोचली आहे. राजधानीत पोहोचल्यावर टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. T20 विश्वचषक-2024 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटला अलविदा केला होता. यानंतर सूर्यकुमार यादवची भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमारची ही दुसरी मालिका आहे.

Gwalior ✈️ Delhi#TeamIndia have arrived for the 2nd #INDvBAN T20I 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/jBWuxzD0Qe

— BCCI (@BCCI) October 8, 2024

ग्वाल्हेरहून परतताना टीम इंडिया दिल्लीत पोहोचताच सर्व खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. संघाच्या स्वागतासाठी ढोल वाजवण्यात आले. टीम इंडियाचे खेळाडू एकामागून एक बसमधून उतरत असताना हे ढोलकी वाजवणारे त्यांची नावे घेत होते. पण सूर्यकुमार येताच सर्वांनी ‘टीम इंडियाची शान सूर्यकुमार’ अशा घोषणा दिल्या. या लोकांसोबत सूर्यकुमार ढोलावर जोमाने नाचले.

भारतीय संघामध्ये पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे, यामध्ये मयंक अग्रवाल आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण केले आहे. दोघांनीही पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी केली.

Web Title: Ind vs ban team india reached delhi for the second match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 02:15 PM

Topics:  

  • IND VS BAN
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

SA vs AUS : टिम डेव्हिडने मोडला मिस्टर ३६० चा विश्वविक्रम! टी-२० मध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
1

SA vs AUS : टिम डेव्हिडने मोडला मिस्टर ३६० चा विश्वविक्रम! टी-२० मध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार
2

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार

Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत
3

Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत

ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने रचला इतिहास! आयसीसी रँकिंगमध्ये ‘या’ दिग्गजांनंतर ‘असा’ कारनामा करणारा तो पहिलाच..
4

ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने रचला इतिहास! आयसीसी रँकिंगमध्ये ‘या’ दिग्गजांनंतर ‘असा’ कारनामा करणारा तो पहिलाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.