IND vs ENG 2nd T20 Match Tilak Verma's 72-run knock India beats England by 2 wickets in thrilling match
Ind vs Eng 2nd T20 Match : शेवटपर्यंत रोमांचक मोडमध्ये पोहचलेल्या भारत विरुद्ध इंग्लड दुसऱ्या टी-सामन्यात टीम इंडियाने 2 विकेट राखून शानदार विजय प्राप्त केला. टीम इंडियाची सुरुवात तशी अडखळत झाली. सलामी जोडी लवकरच तंबूत परतली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा संघाच्या 19 धावसंख्या असतानाच पॅव्हेलिनमध्ये परतले होते. संजू सॅमसनने 7 चेंडूत 5 धावा तर अभिषेक शर्माने 6 चेंडूत 12 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने शानदार खेळाचे प्रदर्शन करीत मोठी खेळी करून संघाला विजय प्राप्त करून दिला.
भारताचा रोमहर्षक विजय
Take A Bow, Tilak Varma 👏
Scoreboard ▶️ https://t.co/6RwYIFWg7i#TeamIndia | #INDvENG | @idfcfirstbank | @TilakV9 | @surya_14kumar pic.twitter.com/wriIceydhx
— BCCI (@BCCI) January 25, 2025
तिलक वर्माची एकहाजी झुंज
तिलक वर्माने एकहाती किल्ला लढवत संघाला विजयापर्यंत नेले, नाबाद 72 धावा ठोकत इंग्लंडच्या संघाला जेरीस आणले. कर्णधार सूर्यकुमार यादवने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला परंतु 12 धावांवर असताना त्याला ब्रेडन कर्सेने क्लिनबॉल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारताच्या विकेट जात राहिल्या. फलंदाज एकामागून एक येत होते आणि पॅव्हेलिनमध्ये जात होते. तिलक वर्माला वॉशिंग्टन सुंदरने चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजूने तिलक वर्मा एकहाती किल्ला लढवत होता. शेवटपर्यंत त्याने चांगलीच लढत दिली.
72 धावांची खेळी करीत विजयश्री
तिलक वर्माने शानदार खेळीचे प्रदर्शन करीत टीम इंडियाला विजय प्राप्त करून दिला. एकामागोमाग विकेट्स पडत होत्या परंतु तिलकवर्माने आपला आक्रमक पवित्रा बदलला नाही आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. भारताने 19.2 षटकांत 166 धावांचे लक्ष्य 8 विकेट गमावून पूर्ण केले. यामध्ये सर्वाधिक योगदान अर्थात तिलक वर्माचे होते. या सामन्याचा सामनावीराचा किताब तिलक वर्माला देण्यात आला.
इंग्लडच्या संघाची फलंदाजी
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली. परंतु, त्यानंतर कर्णधार जोस बटलरने शानदार संयमी खेळीचे प्रदर्शन करीत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला, जोस बटलरने 30 चेंडूत 45 धावा केल्या. सलामी जोडी फिल्प सॉल्ट आणि बेन डकेट हे अवघ्या 4, 3 धावा करून पॅव्हेलिनमध्ये परतले.
भारताची गोलंदाजी
जोस बटलर आणि हेरी ब्रूक यांनी चांगली भागीदारी करीत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर ब्रेडन कर्से, जेमी स्मिथ व्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. हेरी ब्रूक ला अक्षर पटेल पॅव्हेलिनमध्ये पाठवले. अक्षर पटेलने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करीत 4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 32 धावा केल्या. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 38 धावा केल्या. अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. रवी विष्णोईने आज विशेष चमत्कार करू शकला नाही.