
BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल
BRICS Gold Reserves: अमेरिकेचे वर्चस्व धोक्यात आहे. आपल्या चलनाच्या आधारे आपले वर्चस्व गाजवणारी अमेरिका आता तुटणार आहे. भारत, रशिया आणि चीनचे एक पाऊल अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. हे निर्णय सोन्याशी संबंधित आहेत. भारत, चीन, रशिया आणि ब्राझीलसह ब्रिक्स देशांचे लक्ष सोन्याकडे वळत आहे, ज्यामुळे अमेरिकन चलन डॉलरच्या अडचणी वाढत होत आहे. जगाची चलनशक्ती डॉलरवरून सोन्याकडे वळली आहे. ब्रिक्स देशांच्या या निर्णयामुळे अमेरिकन चलनाला मोठा धक्का बसला आहे.
२०२५ मध्ये भारत, रशिया आणि चीन सारख्या देशांनी त्यांचे सोन्याचे साठे विक्रमी पातळीवर वाढवले आहेत. जर आपण आकडेवारी पाहिली तर २०२५ मध्ये ब्रिक्स देशांकडे जगातील निम्मे सोने असेल. जागतिक मध्यवर्ती बँकेतील सोन्याचे साठे अंदाजे ३५,००० ते ३६,००० टन आहेत, त्यापैकी १७,५०० टनांपेक्षा जास्त सोने चीन, रशिया आणि भारताकडे आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, ब्रिक्स देश आता ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकापुरते मर्यादित नाहीत, तर त्यात इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश देखील समाविष्ट आहेत. हे ब्रिक्स देश एकतर सोने उत्पादन करत आहेत किंवा ते खरेदी करून त्यांचे सोन्याचे साठे वाढवत आहेत. सोन्याच्या उत्पादनाच्या चाबतीत, २०२४ मध्ये चीनने अंदाजे ३८० टन आणि रशियाने ३४० टन उत्पादन केले. तर सप्टेंबर २०२५ मध्ये ब्राझीलने १६ टन खरेदी केले, हे देश केवळ सोने खरेदी किंवा उत्पादन करत नाहीत तर त्याचा पुरवठा देखील नियंत्रित करत आहेत.
हेही वाचा: SBI News: सुट्ट्यांचा परिणाम शेअर बाजारावर, ‘या’ टॉप कंपन्यांना ३५ हजार कोटींचा फटका
ब्रिक्स देश डॉलरवरून सोन्याकडे वळत आहेत. याला अमेरिका देखील जबाबदार आहे. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले. रशियाचा परकीय चलन साठा २०२२ पर्यंत गोठवण्यात आला होता. यामुळे डॉलर आणि डॉलर-आधारित मालमत्ता राजकीय जोखमीच्या अधीन आहेत हे स्पष्ट झाले. या संदर्भात, ब्रिक्स देशांनी त्यांचे लक्ष सोन्यासारख्या तटस्थ मालमत्तेकडे वळवण्याचा निर्णय घेतला. अमेरिका किंवा इतर कोणताही देश सोने गोठवू किंवा नियंत्रित करू शकत नाही, त्यामुळे ब्रिक्स देशांचे डॉलरऐवजी सोन्यावर लक्ष केंद्रित केले.
सोन्याकडे ब्रिक्स देशांचे जाणं अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धोका निर्माण करू शकते. भारत, रशिया आणि चीनसह ब्रिक्स देश जागतिक व्यापाराच्या ३० टक्के नियंत्रण ठेवतात आणि त्यांच्या एकूण व्यापारापैकी जवळपास एक तृतीयांश स्थानिक चलनांमध्ये करतात. सोन्याची खरेदी तिजोरी मजबूत करत आहे. सोन्याचा वापर डॉलरच्या तुलनेत बचाव म्हणून केला जात आहे. हे देश केवळ जास्त सोने उत्पादन किंवा खरेदी करत नाहीत तर कमी विक्री देखील करत आहेत. ब्रिक्स देशांचे सोन्यावरील वाढते नियंत्रण हे जागतिक आर्थिक व्यवस्थेत डॉलरच्या वर्चस्वातील बदलाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. ब्रिक्स डॉलरऐवजी स्वतःचे चलन वापरण्यास प्रोत्सव्हन देत्त आहे. ते डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
डॉलर जगातील सर्वात शक्तिशाली चलन बनले असले तरी, सोन्याच्या मदतीने त्याला आव्हान देण्यासाठी आता एक रोडमॅप तयार केला जात आहे. आक्रमकपणे सोने खरेदी करून, ब्रिक्स देशांनी त्यांच्या तिजोरीत सोन्याचा वाटा वाढवला आहे. डॉलरचा वाटा कमी केला जात आहे. सोन्याची खरेदी वाढवून, ते डॉलरवरील अवलंबित्व कमी करत आहेत. ब्रिक्स देशांच्या सोन्यावर आधारित चलनांकडे जोखीम व्यवस्थापन म्हणून पाहिले जात आहे. ब्रिक्स देशांचे सोन्यावरील वाढती अवलंबित्व आणि सोन्याचा साठा वाढवणे दीर्घकालीन डॉलरला हानी पोहोचवू शकते. मागणी कमी झाल्यामुळे डॉलरचे मूल्य कमी होईल. दीर्घकाळात, त्याच्या मूल्यावर दबाव वाढेल. जरी डॉलर अल्पावधीत रुपयाला दाबत असला तरी, त्याचे उलटी गिनती सुरू झाली आहे.