फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लड महिला संघाचा तिसरा एकदिवसीय सामना : भारतीय महिला संघाची मालिका सध्या इंग्लंड विरुद्ध सुरू आहे. भारतीय महिला संघ मागील एक महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाने टी-ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष हे एक दिवसीय मालिकेवर नक्कीच असेल. एकदिवसीय मालिकेचे आत्तापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत यामध्ये एक सामना हा भारताच्या संघाने जिंकला आहे तर दुसरा सामना हा इंग्लंडने जिंकून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या सामना हा पावसामुळे खराब झाला.
पुढील सामना हा रिव्हर साईड ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे भारतीय महिला संघ हा इंग्लंडविरुद्ध दुसरी मालिका जिंकू इच्छित असेल. भारतीय महिला संघांचा पहिला एकदिवसीय सामना झाला होता यामध्ये भारताच्या संघाने हा सामना 10 बॉल शिल्लक असताना चार विकेट्सने विजय मिळवला होता. यामध्ये दीप्ती शर्मा हिने कमालीची खेळी खेळली होती त्याचबरोबर जेमिमा रॉड्रिक्स हिनेदेखील संघासाठी चांगले कामगिरी केली होती. तर गोलंदाजी मध्ये स्नेह राणा क्रांती गौड या दोघींनीही चांगले कामगिरी केली होती.
London ➡️ Newcastle
Final travel day in the UK ☝️
Train 🚂 Games 🎲 & Mixed emotions #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/BGKKDxPpMw
— BCCI Women (@BCCIWomen) July 21, 2025
दुसऱ्या सामन्या बद्दल सांगायचे झाले तर लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे 29 ओव्हरचा खेळ खेळण्यात आला होता. भारतीय संघाचे फलंदाजी झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि इंग्लंडला 24 ओव्हर देण्यात आले. त्यामध्ये 24 ओव्हर मध्ये इंग्लंडच्या संघाला 116 धावा करायचा होता तर त्यांनी 21 ओव्हर मध्ये पूर्ण करून डीएलएस मेथडच्या पद्धतीने सामना जिंकला होता.
या सामनामध्ये भारताचे फलंदाज फार काही चांगले कामगिरी करू शकले नाहीत भारतीय संघासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा स्मृति मानधना हीने केल्या होत्या. दीप्ती शर्मा हिने या सामन्यात देखील नाबाद खेळी खेळ खेळली तिने 34 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या.
भारतीय महिला संघाचा तिसरा इंग्लंड विरुद्ध सामना हा भारतीय वेळेनुसार 5.30 मिनिटांनी सुरू होणार आहे. मालिकेमध्ये बरोबरी झाल्यामुळे आता तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाने ही मालिका जिंकावी अशी आशा आहे. क्रिकेटच्या त्यांचे लक्ष हे तिसऱ्या एक दिवसीय सामन्यावर असणार आहे.