फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना सुरु व्हायला फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. भारताच्या संघाने सुरु असलेल्या मालिकेचा एक सामना जिंकला आहे तर दोन सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारताच्या संघासाठी मँचेस्टरमध्ये होणारा कसोटी सामना फारच महत्वाचा असणार आहे, त्यामुळे टीम इंडीयाच्या कामगिरीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. भारताच्या संघामध्ये तीनही सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. दुसऱ्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह हा संघाबाहेर होता त्याच्या जागेवर आकाशदीपला संधी मिळाली होती.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतासाठी अडचणी वाढत आहेत. भारत आधीच मालिकेत पिछाडीवर आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. वृत्तानुसार, भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे चौथी कसोटी खेळू शकणार नाहीत. अर्शदीप सिंगला सराव करताना बोटाला दुखापत झाली, तर आकाश दीपला पाठीचा त्रास आहे. दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी देखील मालिकेतून बाहेर पडले आहेत. वृत्तांनुसार, अंशुल कंबोज संघात दाखल झाला आहे.
अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी मिळणार?
अलिकडेच असे सांगण्यात आले आहे की अंशुल कंबोजला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. इतर भारतीय खेळाडूंच्या दुखापतींमुळे आता अंशुल चौथा कसोटी सामना खेळू शकतो असे संकेत मिळत आहेत. जर आकाश दीपला विश्रांती देण्यात आली तर अंशुल त्याच्या जागी खेळू शकतो. मँचेस्टर कसोटीत असे होण्याची शक्यता जास्त आहे. अंशुलची आकडेवारी खूप चांगली आहे आणि त्यामुळे गंभीर-गिल त्याला दुर्लक्ष करू शकणार नाहीत.
अंशुल कंबोज अलीकडेच टीम इंडिया अ चा भाग होता. दरम्यान, त्याचे इंग्लंड लायन्स विरुद्धचे सामने पाहायला मिळाले. अंशुलने येथे झालेल्या दोन सामन्यात एकूण ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्यात अंशुलने ४ विकेट्स घेतल्या आणि नाबाद ५१ धावा करत फलंदाजीतही योगदान दिले. कंबोज सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि हे लक्षात घेऊन कर्णधार गिलने त्याला संघात स्थान द्यावे.
Four Tests and four different pace trios for Team India! 🇮🇳🙆♂️
What’s your take on India’s bowling line-up so far in the ongoing series? 🏏👀#JaspritBumrah #MohammedSiraj #Tests #ENGvIND #Sportskeeda pic.twitter.com/OeKWxR9d54
— Sportskeeda (@Sportskeeda) July 21, 2025
अंशुल कंबोजने प्रथम श्रेणीत त्याच्या चमकदार कामगिरीने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तो हवेत चेंडू फिरवण्यासाठी ओळखला जातो. कंबोजने २४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने ७९ विकेट्स घेतल्या आहेत. एकदा त्याने एका डावात ४९ धावा देऊन सर्व १० विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीत अंशुलला संधी देणे हा योग्य निर्णय ठरू शकतो.