
फोटो सौजन्य – X (RevSportz Global)
शुभमन गिलचा व्हायरल फोटो : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या मॅचेस्टर कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या दिनी चार विकेट्स गमावून 270 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पुन्हा एकदा मोठा झटका लागला. भारताच्या संघामध्ये दुखापतीचे प्रमाण वाढत असताना चालू सामन्यामध्ये ऋषभ पंत याला दुखापत झाली आणि त्याला रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मैदान सोडावे लागले. चांगला फॉर्ममध्ये असलेला ऋषभ पंत त्याला दुखापत होणे हे भारतीय संघासाठी फारच धक्कादायक आहे.
ऋषभ पंत हा सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये या कसोटी मालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत पण सातत्याने वाढणाऱ्या भारतीय संघाच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. आता एक खूप फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल हा ऋषभ पंत हा जखमी झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लगेचच रुग्णालयामध्ये पोहोचला आहे.
Update 🚨 Shubman Gill reaches the medical centre to check on Rishabh Pant.#ENGvsIND pic.twitter.com/UwI6HaKDfj — RevSportz Global (@RevSportzGlobal) July 23, 2025
शुभमन गिल हा पहिला इनिंगमध्ये फार काही चांगले कामगिरी करू शकला आहे तर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत ह्याला दुखापत झाल्यानंतर तो पाहण्यासाठी लगेचच हॉस्पिटलला पोहोचला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर आता मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
भारतीय संघाच्या पहिल्या दिनाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडीयाने पहिल्या दिनी ४ विकेट्स गमावुन 264 धावा केल्या आहेत. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने अर्धशतक झळकावले, तर केएल राहुल याने 46 धावांची खेळी खेळली. भारताच्या संघाला दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी कमालीची कामगिरी करुन दमदार सुरुवात करुन दिली.
IND vs ENG : 6,6,6,6,6,6…आयुष म्हात्रेची विरार लोकल सुसाट! टीम इंडियाच्या कर्णधाराने झळकावले शतक…
मँचेस्टर कसोटी सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारतीय डावाच्या ६८ व्या षटकात ऋषभ पंतने क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला . मात्र, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. यानंतर चेंडू थेट पंतच्या पायाला लागला. मग काय झाले, पंत वेदनेने ओरडू लागला. वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले . यानंतर पंत रिटायर हर्ट झाला आणि स्टेडियमबाहेर गेला. त्याची दुखापत खूपच गंभीर होती आणि पंतच्या पायातून रक्तही वाहत होते.