फोटो सौजन्य – Youtube
U19 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याचा काल चौथा दिवस पार पडला भारताच्या संघासमोर इंग्लंडने 355 धावांचे लक्ष उभे केले होते. यामध्ये भारताचा अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने शतक झळकावले. तर आयपीएल 2025 चा स्टार वैभव सूर्यवंशी हा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. पहिला सामन्यांमध्ये देखील तो फार काही चांगले कामगिरी करू शकला नव्हता तर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील फेल ठरला.
भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली संदर्भात सविस्तर जाणून घ्या. इंडियन प्रीमियर लीग 2025 चा युवा खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सचा स्थान वैभव सूर्यवंशी हा त्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. तर दुसरा विकेट टीम इंडियाने विहान मल्होत्रा याचा गमावला होता.
🚨 100* FROM JUST 64 BALLS BY AYUSH MHATRE 🚨
– Hundred in 1st innings in 1st match.
– 80 in 1st innings in 2nd match.
– Hundred in 2nd innings in 2nd match.18-YEAR-OLD CAPTAIN’s MAGIC IN ENGLAND FOR INDIA U-19. 🥶 pic.twitter.com/JDhx1HwX6Q
— Johns. (@CricCrazyJohns) July 23, 2025
भारताच्या संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर भारताचा अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि अभिज्ञान कुंदू या दोघांनी भारतीय संघाची खेळी सांभाळली. विहान मल्होत्रा यांनी 27 धावांची खेळी खेळली होती तर भारताचा कर्णधार आयुष मात्रे याने 126 धावा केल्या.
टीम इंडियाचा U19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने शतकीय खेळी खेळली. त्याने 80 चेंडूंमध्ये 126 धावा केल्या. यामध्ये त्यांनी सहा षटकार आणि तेरा चौकार मारले. त्याने पहिल्या सामन्यांमध्ये देखील शतक झळकावले होते. पण तो सामना अनिर्णित राहिला. आयुष म्हात्रे याने आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग साठी पदार्पण केले आणि यामध्ये देखील त्याने कमालीचे कामगिरी केली होती.
IND VS ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंतला सोडावं लागलं मैदान…चालु सामन्यात गंभीर दुखापत