फोटो सौजन्य - X
भारताचा संघ सध्या इंग्लडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळत आहे. भारताच्या युवा संघाने या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. या मालिकेमध्ये इंग्लडच्या संघाला टीम इंडीयाने बरोबरीची टक्कर दिली आहे. पाचवा सामना जिंकण्यासाठी इंग्लडच्या संघाला 35 धावांची गरज आहे. तर भारताच्या संघाला विजयासाठी ३ विकेट्ची गरज आहे. हा सामना खूपच रोमांचक झाला आहे. एकीकडे इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ३५ धावांची आवश्यकता असताना, टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी ४ विकेट्सची आवश्यकता आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी शतके झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. सुरु असलेल्या सामन्यामध्ये हॅरी ब्रूक याने १११ धावा धावांची खेळी खेळुन विकेट गमावली, आता त्याने शानदार शतक झळकावून ७० वर्षे जुना विक्रम मोडला. चौथ्या दिवशी हॅरी ब्रूकने शानदार फलंदाजी केली आणि शानदार शतक झळकावले. हॅरी ब्रूकने केवळ ९१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हॅरी ब्रूकने जो रूटसह चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली.
यासह इंग्लंडने सामन्यात शानदार पुनरागमन केले. ब्रूक आता टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तिसरा इंग्लिश फलंदाज बनला आहे. जेमी स्मिथ सध्या फलंदाजी करत आहे त्याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे, तो टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा पहिला इंग्लिश फलंदाज ठरला आहे, त्याने भारताविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात ८० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर बेन डकेट दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ८८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
या मालिकेत टीम इंडियाविरुद्ध ब्रुकची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. त्याने ५ सामन्यांच्या ९ डावात फलंदाजी करताना ४८१ धावा केल्या. या मालिकेमध्ये त्याने २ शतके आणि २ अर्धशतके केली. यादरम्यान ब्रुकची सरासरी ५३.४४ होती. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करताना हॅरी ब्रुकने ९८ चेंडूत १११ धावांची शानदार खेळी केली.
A sensational ton from Harry Brook as England march on at The Oval 🔥#WTC27 | #ENGvIND 📝: https://t.co/SNl4Ym0dTV pic.twitter.com/VkuETnVhJC — ICC (@ICC) August 3, 2025
हॅरी ब्रूक आता ५० व्या कसोटी डावात १० वे शतक करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी १९५५ मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाइड वॉलकॉटने हा पराक्रम केला होता. त्याने ४७ कसोटी डावात १० शतके ठोकण्याचा महान पराक्रम केला होता.