Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 5th Test : पावसाने केला खेळ खराब, जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी आणला भारताच्या विजयात अडथळा! वाचा सामन्याचा अहवाल

चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाच्या हाती ६ विकेट्स लागेल आहेत, आता टीम इंडियाला आणखी ३ विकेटची गरज आहे. IND vs ENG यांच्यातील पाचव्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 04, 2025 | 08:20 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या पाचवा कसोटी सामना सुरु आहे. 
  • पावसाने खेळ खराब केल्यामुळे खेळ पाचव्या दिनी होणार आहे
  • इंग्लडच्या संघासाठी जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शतके झळकावली आहेत. 
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये चौथ्या दिनी इंग्लंडच्या फलंदाजांनी धुमाकुळ घातला. यामध्ये संघाचा दिग्गज फलंदाज जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी कमालीची फलंदाजी केली. जो रूट आणि हॅरी ब्रुक या दोघांनीही शतके झळकावली. चौथ्या दिनी सामन्यादरम्यान पावसाने आगमन केल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे उर्वरित सामना हा पाचव्या दिनी होणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना फारच महत्त्वाचा आहे टीम इंडियाचा या सामन्यात पराभव झाला तर संघाला मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. 

चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाच्या हाती ६ विकेट्स लागेल आहेत, आता टीम इंडियाला आणखी ३ विकेटची गरज आहे. तर इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 35 धावांची गरज आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

IND vs ENG 5th Test : भारताच्या संघाने पाचव्या कसोटी जिंकण्यापूर्वी रचला इतिहास! केला अनोखा विश्वविक्रम; ३२ वर्षांचा विक्रम मोडला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ रविवारी खराब प्रकाश आणि नंतर पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती, तर भारताला चार विकेट्सची आवश्यकता होती. यावेळी जेमी स्मिथ दोन धावा काढल्यानंतर क्रीजवर उपस्थित होता, तर जेमी ओव्हरटनने आपले खाते उघडले नाही. ओव्हल मैदानावर विजयासाठी विक्रमी ३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सहा विकेट्सवर ३३९ धावा केल्या आहेत.

इंग्लंड मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. दुखापतीमुळे पहिल्या डावात फलंदाजी करू न शकलेला ख्रिस वोक्स मात्र ड्रेसिंग रूममध्ये दुखापतग्रस्त हातावर स्लिंग आणि कसोटी संघाची जर्सी घालून दिसला, ज्यामुळे गरज पडल्यास तो फलंदाजीला येऊ शकतो असे सूचित होते. चहापानानंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी शानदार गोलंदाजी करून भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

चहापानाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडने चार विकेट गमावून ३१७ धावा करून मजबूत स्थितीत कामगिरी केली होती, परंतु कृष्णाने जेकब बेथेल आणि जो रूटला बाद करून उत्साह वाढवला. रूटने १०५ धावा केल्या. दिवसाच्या पहिल्या दोन सत्रात त्याला हॅरी ब्रूककडून उत्कृष्ट साथ मिळाली. ब्रूकने ९८ चेंडूत १११ धावांची आक्रमक खेळी केली आणि रूटसोबत १९५ धावांची भागीदारी करून सामन्यावर इंग्लंडचे वर्चस्व प्रस्थापित केले.

All eyes on the final day of the final Test 🏟️ England 339/6, need 35 more runs to win#TeamIndia 4⃣ wickets away from victory Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/ib6QgGqBnt — BCCI (@BCCI) August 3, 2025

त्याआधी, ब्रूकने ९८ चेंडूत १११ धावांच्या जलद खेळीत १२ चौकार आणि दोन षटकार मारले. आकाशदीपने चहापानापूर्वी ब्रूकला बाद केले पण तोपर्यंत त्याने इंग्लंडला विजयाच्या मार्गावर नेले होते. या सत्रात एकूण १५३ धावा झाल्या आणि फक्त एक विकेट पडली. यावरून सामना सध्या कोणत्या स्थितीत आहे हे दिसून येते. हलकेच पाऊस पडत आहे. जर हे असेच चालू राहिले तर भारताच्या वेगवान गोलंदाजांना विश्रांती घेण्यासाठी आणि जादू करण्यासाठी स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी वेळ मिळेल. पण असे दिसते की हा सामना आता भारताच्या आवाक्याबाहेर आहे.

IND vs ENG 5th Test : टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी सुनील गावस्कर यांनी केली खास गोष्ट! कर्णधार गिलला दिले मोठे काम

इंग्लंडने कालच्या एका विकेटवर ५० धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. आजच्या सकाळच्या सत्रात बेन डकेटने वेगवान फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने बेन डकेटला स्लिपमध्ये केएल राहुलकडून झेलबाद केले. बेन डकेटने ८३ चेंडूत सहा चौकारांसह ५४ धावा केल्या. त्यानंतर, २८ व्या षटकात मोहम्मद सिराजने कर्णधार ऑली पोप (२७) ला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले.

इंग्लंडने दुपारच्या जेवणापर्यंत तीन विकेट गमावून १६४ धावा केल्या होत्या आणि हॅरी ब्रुक (नाबाद ३८) आणि जो रूट (नाबाद २३) क्रीजवर उपस्थित होते. भारतीय संघाला पहिल्या सत्रात दोन यश मिळाले, तर इंग्लंडनेही ११४ धावा केल्या. जर हॅरी ब्रुकचा झेल घेतला असता तर भारताने वर्चस्व गाजवले असते पण सिराजने चूक केली.

Web Title: Ind vs eng 5th test rain spoils the game joe root and harry brook hinder india victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • Shubman Gill
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ : हा युवा खेळाडू घेणार वॉशिंग्टन सुंदरची जागा…मिळणार का भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी? BCCI ने केले जाहीर
1

IND vs NZ : हा युवा खेळाडू घेणार वॉशिंग्टन सुंदरची जागा…मिळणार का भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी? BCCI ने केले जाहीर

बांग्लादेश अडचणीत…BCCI शी पंगा घेतल्यामुळे BCB ला पडलं महागात! देशाचे होणार कोट्यवधींचे नुकसान
2

बांग्लादेश अडचणीत…BCCI शी पंगा घेतल्यामुळे BCB ला पडलं महागात! देशाचे होणार कोट्यवधींचे नुकसान

IND vs NZ: पहिल्या सामन्यामधून अर्शदीप सिंहला का केलं इग्नोर? कर्णधार शुभमन गिलने सांगितले आश्चर्यकारक कारण
3

IND vs NZ: पहिल्या सामन्यामधून अर्शदीप सिंहला का केलं इग्नोर? कर्णधार शुभमन गिलने सांगितले आश्चर्यकारक कारण

RCB W vs UPW W : स्मृती मानधनाचा संघ विजयाची साखळी कायम ठेवणार, यूपी वाॅरियर्सचे असणार आव्हान! वाचा Match Preview
4

RCB W vs UPW W : स्मृती मानधनाचा संघ विजयाची साखळी कायम ठेवणार, यूपी वाॅरियर्सचे असणार आव्हान! वाचा Match Preview

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.