फोटो सौजन्य - BCCI
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, भारताचे मुख्य खेळाडू हे संघामधुन बाहेर झाल्यानंतर टीम इंडीयाने इंग्लडच्या संघाला बरोबरीची टक्कर दिली आहे. आता भारताच्या संघाला शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासाठी अनेक चढ-उतार आले. पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सुरुवात लीड्समधील पराभवाने केली. त्यानंतर, बर्मिंगहॅममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. लंडनमधील तिसरा कसोटी सामना त्यांनी गमावला आणि मँचेस्टरमध्ये खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
भारताने आतापर्यंत पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत अपवादात्मक कामगिरी केली आहे. ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसापूर्वीच टीम इंडियाने एक अनोखा विश्वविक्रम रचला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ मध्ये भारताने एकूण ४७० चौकार मारले आहेत. कोणत्याही मालिकेत कोणत्याही संघाने मारलेल्या चौकारांची ही सर्वाधिक संख्या आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ मध्ये भारताच्या संघाने 11 शतके झळकावली आहेत. यामध्ये केएल राहुल, रविंद्र जडेजा, वाॅशिग्टन सुंदर, शुभमन गिल याने चार शतके झळकावली आहे, तर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी २ शतके नावावर केली आहेत.
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये कमालिची फलंदाजी केली आहे, यामध्ये भारताच्या फलंदाजांनी शतके देखील झळकावली आहेत. चालू मालिकेत भारताने ४७० चौकार (४२२ चौकार आणि ४८ षटकार) मारून ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. १९९३ च्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ४६० चौकार (४५१ चौकार आणि ९ षटकार) मारले होते. भारताने हा ३२ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात इंग्लंडला २४७ धावांवर रोखल्यानंतर भारत फलंदाजीसाठी उतरला. यशस्वी जयस्वालच्या ११८ धावांच्या खेळी, आकाशदीपच्या ६६ धावा आणि रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ५३-५३ धावांच्या खेळीमुळे भारताने सामन्याच्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या.
इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर जॅक क्रॉलीला १४ धावांवर मोहम्मद सिराजने बाद केले. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी बेन डकेट नाबाद ३४ धावांसह क्रीजवर होता. तो बराच वेळ फलंदाजी करून इंग्लंडला विजयाकडे नेण्याची आशा बाळगेल.