
फोटो सौजन्य – X
मॅचेस्टर कसोटीत भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात ऋषभ पंत गंभीर जखमी : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या बद्दल मॅचेस्टर येथे सामना सुरू झाला आहे. भारताच्या संघाने या सामन्यात दमदार सुरुवात केली. भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी संघाला कमालीची सुरुवात करून दिली. लॉर्ड्स कसोटी सामन्यांमध्ये भारताचा उप कर्णधार ऋषभ पंत याला हाताला दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले होते. आता भारतीय संघासाठी चौथ्या कसोटीमध्ये मोठा धक्का लागला आहे.
चौथ्या कसोटीमध्ये भारताचा विकेट की परिषद पण त्याला पुन्हा एकदा पायाला दुखापत झाली आणि तो जखमी झाला आहे. क्रिस वोक्स याचा चेंडू त्याच्या पायाला लागून त्याच्या तळपायाला लग्नानंतर रक्त व्हायला लागले होते त्यामुळे त्याला चालता ही येणे कठीण झाले होते. आणि त्यामुळे त्याला मैदानामध्ये चालता न आल्यामुळे रुग्णवाहिकेला मैदानात आणावे लागले आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी नेण्यात आले आहे.
Rishabh Pant is driven off the field of play after suffering some severe swelling on his right foot and Ravindra Jadeja walks out to the middle… 🩹 pic.twitter.com/vJlu5CABQ8 — Sky Sports Cricket (@SkyCricket) July 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी मधील पहिल्या दिनी भारताच्या संघाला तीन विकेट्स गमावल्यानंतर ऋषभ पंत याने साई सुदर्शन सोबत भारतासाठी 50 अधिक धावांची भागीदारी केली होती. चालू सामन्यांमध्ये रिषभ पंती आणि 37 धावांची खेळी खेळली होती यामध्ये त्यांनी एक षटकार आणि दोन चौकार मारले होते त्यानंतर त्याला रिटायर आउट व्हावे लागले.
ऋषभ पंत नुकताच दुखापतीतून बरा झाला होता आणि चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त होता. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करताना पंतच्या बोटाला एक चेंडू लागला, त्यानंतर तो खूप वेदनांमध्ये दिसला. ऋषभला मैदान सोडावे लागले आणि तो दोन्ही डावात विकेटकीपिंग करू शकला नाही. खेळाडूंच्या दुखापतींमुळे भारतीय संघ आधीच त्रस्त आहे.
आकाशदीप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, तर अर्शदीपलाही सरावादरम्यान दुखापत झाली. पण पंतच्या अलीकडील फॉर्मचा विचार करता, त्याची दुखापत ही सर्वात वाईट बातमी आहे. दुखापत होण्यापूर्वी पंत क्रीजवर होता आणि ३७ धावा करून खेळत होता.