IND Vs ENG: England captain's wicket and DSP Siraj created history; became the first player in the world to do 'this'
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळल जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक खास कारनामा केला आहे. सिराजने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले आहे. असे करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी, बेन स्टोक्स कधीही कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला नव्हता.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. परंतु, तो पहिल्याच चेंडूवर पव्हेलियनमध्ये परतला. तो पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरली आहे. ५ डिसेंबर २०१३ रोजी अॅडलेड ओव्हल येथे इंग्लंड संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून, स्टोक्स ११३ कसोटी सामन्यांच्या २०२ डावांमध्ये १६ वेळा आपले खाते उघडू शकलेला नाही, परंतु शुक्रवारी तो पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
बर्मिंगहॅम कसोटीत जगातील नंबर एकचा कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज सांभाळत आहे. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या २२ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जो रूटला २२ धावांवर आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर स्टोक्सला बाद करून इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. रूट आणि स्टोक्स दोघांच्याही ऋषभ पंतने विकेटमागे अप्रतिम झेल पकडले. शुक्रवारी इंग्लंडला रूट आणि स्टोक्सकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु दोघांनाही फलंदाजीत आपली छाप पाडता आली नाही.
That’s two in twoooooo…. 🔥#MohammedSiraj is on fire at the moment as he dismisses the English skipper, #BenStokes for a GOLDEN DUCK! 🤩🤩
𝗬𝗲𝗵 𝘀𝗲𝗲𝗸𝗵𝗻𝗲 𝗻𝗮𝗵𝗶, 𝘀𝗲𝗲𝗸𝗵𝗮𝗻𝗲 𝗮𝗮𝘆𝗲 𝗵𝗮𝗶 😎👊🏻#ENGvIND 👉 2nd TEST, Day 3 | LIVE NOW on JioHotstar ➡… pic.twitter.com/lG7FoBArNx
— Star Sports (@StarSportsIndia) July 4, 2025
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाची सुरुवात फारसी चांगली झाली नाही, केएल राहुल २ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला करुण नायर देखील ३१ धावा झटपट बाद झाला. यशस्वी जयस्वाल ८७ धावा काढून बाद झाला. या दरम्यान, शुभमन गिल आणि रवींद्र जाडेजा यांनी डाव सावरला.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात गिलने २६९ धावांची खेळी केली. या खेळीसह गिल हा भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यासोबतच तो इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे. गिलने या डावात ३० चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. त्याच्याशिवाय जडेजाने ८९ धावा तर सुंदरने ४२ धावांचे योगदान दिले.