फोटो सौजन्य : X (JioHotstar)
भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स सामन्याचा अहवाल : भारत अ संघ सध्या इंग्लंड लायन्स विरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. यामध्ये काल या दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस पार पडला. या सामन्यात भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिले 348 धावा करून सर्वबाद झाले आहेत. सध्या इंग्लंडचा संघ आता फलंदाजी करत आहे. यामध्ये दुसऱ्या दिनी त्यांनी तीन विकेट्स गमावून 192 धावा केल्या आहेत. दुसऱ्या आणि पहिल्या दिनी दोन्ही संघाच्या खेळाडूंची कामगिरी कशी यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
इंडियन लायन्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झालं तर थॉमस हॅनिस याने संघासाठी 54 धावा केला यामध्ये नऊ चौकारांचा समावेश आहे. बेन मॅककिने हा स्वस्तात बाद झाला त्याने फक्त बारा धावा केल्या आणि विकेट गमावली. एमिलियो गाय याने दुसऱ्या दिनी 71 धावांची खेळी खेळली यामध्ये सहा चौकारांचा समावेश आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिनी समाप्तीनंतर सध्या इंग्लंड लायन्ससाठी जॉर्डन मॅथ्यू कॉक्स आणि जेम्स रीव हे दोघे फलंदाजी करत आहेत. जॉर्डन मेथ्याने 31 धावा दुसऱ्या दिनाच्या समाप्तीपर्यंत केल्या आहेत.
भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर अंशुल कंबोज याने संघाला एक विकेट मिळवून दिला आहे दुसऱ्या दिनी. त्याचबरोबर तुषार देशपांडेने देखील संघाला एक विकेट्सची कमाई करून दिली आहे. तनुष कोटीयन यांना संघामध्ये संधी मिळाली आहे त्यांना देखील संघाला एक विकेट मिळवून दिला आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर के एल राहुल याने संघासाठी कमालीची कामगिरी केली. तो पहिल्या सामन्यात आयपीएल खेळत होता त्यामुळे त्याने दुसरा सामन्यांमध्ये उपस्थिती दर्शवली आणि शतकीय खेळी खेळली. केएल राहुल याने पहिल्या डावामध्ये 116 धावा केल्या तर करून नायर यांनी देखील महत्त्वाच्या 40 धावा केल्या. ध्रुव जुरेल याने आणखी एकदा अर्धशतक झळकावले त्याने तीन डावांमध्ये आत्तापर्यंत तीन अर्धशतक नावावर केले आहेत. त्याच्या या खेळीने क्रिकेटच्या हातांना त्याने प्रभावित केले आहे. नितीश कुमार रेड्डी याने 34 धावांची खेळी खेळली.
भारतीय अ संघाचा कर्णधार अभिमन्यु ईश्वरन याने या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये देखील निराशाजनक कामगिरी केली आहे. तो मागील सामन्यात देखील स्वतात बाद झाला होता.