फोटो सौजन्य – X (BCCI)
U19 India vs England Match Report : अंडर १९ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या एकदिवसीय मालिकेला कालपासून सुरुवात झाली होती. यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हा चेन्नईमध्ये आयपीएल 2025 मध्ये सामील झालेला आयुष म्हात्रे करत आहे. भारतीय युवा संघ हा इंग्लंडच्या युवा संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका त्याचबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना पूर्ण झाला आणि यामध्ये भारताच्या संघाने सहा विकेट्सने विजय मिळवला.
पहिल्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत भारतासमोर 175 धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य 24 ओव्हर मध्ये पूर्ण केले. भारताच्या संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाकडे १–० अशी आघाडी आहे. या पहिल्या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने संघासाठी 21 धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने चार चौकार मारले. आयपीएल 2025 चा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये देखील कमालीची कामगिरी केली आणि त्याचा जलवा दाखवला. या सामन्यात त्याने 19 चेंडूमध्ये 48 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने पाच षटकार आणि तीन चौकार मारले दोन धावांनी त्याचे अर्धशतक हुकले.विहान मल्होत्रा याने संघासाठी 18 धावा केल्या. अभिज्ञान कुंदू त्याने संघासाठी चांगली खेळी खेळली, त्यांने या पहिल्याच सामन्यात 45 धावांची खेळी खेळली आणि नाबाद राहिला.
India U-19 beat England U-19 by 6 wickets in the first one-day match to take a 1-0 lead in the five-match series. 🔥#Cricket #India #England #U19 pic.twitter.com/2n5YvcRxUD
— Sportskeeda (@Sportskeeda) June 27, 2025
राहुल कुमार याने संघासाठी 14 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर कणिक चौहान याने संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. त्याचबरोबर हेनिल पटेल याने भारतीय संघाला दोन विकेटची कमाई करून दिली. मोहम्मद इनान, वैभव सूर्यवंशी, अंबरीश तिघांनी प्रत्येकी संघाला दोन दोन विकेट्स मिळवून दिले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केली आणि इंग्लंडच्या संघाला 174 धावांवर रोखलं.