फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लड पहिल्या टी20 सामन्यातील संभाव्य प्लेइंग 11 : भारतीय पुरुष संघ सध्या इंग्लड विरुद्ध मालिका खेळत आहे, या मालिकेचा पहिला सामना झाला आहे. काही दिवसात दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय युवा U19 संघ आणि भारतीय महिला संघ हा इंग्लडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारताचा महिला संघ हा इंग्लडविरुद्ध 28 जुनपासुन टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमध्ये भारताचा संघ हा पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे त्याचबरोबर तीन सामन्याची एकदिवसीय मालिका देखील खेळवली जाणार आहे.
टी-२० मालिकेचा पहिला सामना २८ जून रोजी ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. इंग्लंड महिला संघाची कर्णधार नॅट सेव्हियर ब्रंट आहे. पहिला टी-२० सामना जिंकून भारतीय महिला संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. या सामन्यासाठी भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन काय असू शकते ते जाणून घेऊया.
WI vs AUS : थर्ड अंपायरच्या निर्णयावरुन वाद, WI कोचही संतापले! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
स्मृती मानधनाने जगाच्या कानाकोपऱ्यात धावा केल्या आहेत आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. ती पहिल्या टी20 सामन्यात सलामी देऊ शकते आणि तिला पाठिंबा देण्यासाठी शेफाली वर्मा संघात संधी मिळवू शकते. शेफालीने गेल्या वर्षी तिचा शेवटचा टी20 सामना खेळला होता आणि आता ती टी20 संघात परतली आहे. हरलीन देओलला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. ती स्फोटक फलंदाजीत तज्ज्ञ आहे आणि आक्रमक फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकते. जेमिमा रॉड्रिग्जला पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. त्याचबरोबर विकेटकिपरची भुमिका रिचा घोष साकारु शकते. हरमनप्रीत कौरला दीर्घ अनुभव आहे आणि तिने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५८९ धावा केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यावर संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
Beckenham 🚌 Nottingham#TeamIndia have arrived for the T20I series opener against England women 🙌#ENGvIND pic.twitter.com/yLWebAvkDg
— BCCI Women (@BCCIWomen) June 27, 2025
पहिल्या टी-२० सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दीप्ती शर्मालाही संधी मिळू शकते. ती खाली उतरून चांगली फलंदाजी करण्यात माहिर आहे आणि तिच्या गोलंदाजीने विरोधी संघालाही हरवते. तिने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०८६ धावा केल्या आहेत आणि १३८ विकेट्स घेतल्या आहेत. तिच्यासोबत स्नेह राणालाही संधी मिळू शकते. अरुंधती रेड्डी गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसू शकते. तिच्याशिवाय राधा यादव आणि तरुण श्री चरणी यांनाही संधी मिळू शकते. या खेळाडूंवर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि श्री चरणी.