फोटो सौजन्य : X
India vs England : भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, या मालिकेच्या पहिल्या सामन्याला आज पासून सुरुवात झाले आहे. या सामन्यात भारताच्या संघाने फार काही चांगले सुरुवात केली नाही पण सरफराज खान आणि करून नायर या दोघांनी कमालीची खेळी दाखवत भारतीय संघाला सावरल आहे. करून नायरला भारतीय संघामध्ये तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा स्थान मिळाले आहे आणि त्याने त्याचे संधीचे सोने करून अर्धशतक झळकावले आहे. आज या सामन्यात भारतीय खेळाडुची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर आम्ही तुम्हाला या वृत्तात सांगणार आहोत.
इंग्लड लायन्सच्या संघाने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 2 विकेट लवकर गमावले होते. भारतीय अ संघाचे नेतृत्व या सामन्यात अभिमन्यु ईश्वरन करत आहे. पण तो या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. अभिमन्यू ईश्वरन हा आज विशेष कामगिरी करू शकला नाही त्याने 8 धावा केल्या आणि विकेट गमावली. यशस्वी जयस्वाल याने देखील आज मोठी कामगिरी करून करण्यात अपयशी ठरला त्यांनी 24 धावा केल्या आणि झेलबाद झाला. यामध्ये त्याने एक षटकार आणि तीन चौकार मारले.
IND vs ENG : इंग्लंड लायन्सच्या संघाने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! पाहा दोन्ही संघाची Playing 11
करून नायर आणि सरफराज खान या दोघांनी चाहत्यांना प्रभावित केले. दोघेही अजूनही नाबाद खेळी खेळत आहेत. भारताचे संघाने लवकर विकेट्स गमावल्यानंतर करून नायर आणि सरफराज खान या दोघांनीही भारताचा खेळ सांभाळला. करून नायर यांनी आजच्या सामन्यात 85 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. मागील बरेच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्यामुळे आता त्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर सरफराज खान याने देखील अर्धशतक झळकावले.
FIFTY FOR KARUN NAIR…!!! 🇮🇳
Karun Nair completed fifty from 85 balls against England Lions, A huge confident booster ahead of the Test series. pic.twitter.com/6OTqVbcyL8
— Johns. (@CricCrazyJohns) May 30, 2025
सरफराज खान यांनी देखील आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावून सिलेक्टरचे लक्ष वेधून घेतले आहे. आजच्या सामना सरफराज खान याने 84 चेंडूंमध्ये पन्नास धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटी संघामधून ड्रॉप केल्यानंतर आणखी एकदा त्याने कमालीची कामगिरी केली आहे.