फोटो सौजन्य – X
भारताचा संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, या मालिकेचा सध्या चौथा सामना सुरु आहे. सुरु असलेल्या मालिकेमध्ये भारताचा संघ पिछाडीवर आहे, मालिकेमध्ये तीन सामन्यानंतर 2-1 अशी इंग्लडकडे आघाडी, त्यामुळे भारताच्या संघासाठी चौथा सामना फारच महत्वाचा आहे. भारताच्या संघाने चौथ्या सामन्याच्या पहिल्या सेशनमध्ये चांगली सुरुवात केली होती त्यानंतर भारताच्या संघाने दुसऱ्या सेशनमध्ये 3 विकेट्स गमावले आणि तिसऱ्या सेशनमध्ये भारताच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली. साई सुदर्शनचा विकेट भारताच्या संघाने गमावला. त्याआधी टीम इंडीयाचे विकेटचे जेवढे दु:ख झाले नसेल तेवढे दु:ख ऋषभ पंत यांच्या दुखापतीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांना झाले आहे.
भारताने प्रथम फलंदाजी केली आणि दरम्यान संघाला मोठा धक्का बसला. ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आणि त्याला रिटायर्ड हर्ट झाला. पंत नीट उभा राहू शकत नव्हता. नंतर असे दिसून आले की पंत स्कॅनसाठी जात आहे. आता ऋषभबद्दल मोठी बातमी आली आहे आणि त्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसेल.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
Rishabh Pant has fractured his toe and has been advised six weeks of rest, making his chances of playing the fourth Test slim. 🇮🇳🧤
The medical team is assessing if he can bat after taking a painkiller, but the chances remain unlikely. 🏏#RishabhPant… pic.twitter.com/0cXIfs2FPL
— Sportskeeda (@Sportskeeda) July 24, 2025
बीसीसीआयच्या एका सूत्राने एक्सप्रेस स्पोर्ट्सला सांगितले की, ऋषभ पंतला ६ आठवडे खेळण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तो बाहेर आहे. वृत्तांनुसार, पंतला आधाराशिवाय चालताही येत नाही. अहवालात म्हटले आहे की, ‘स्कॅन रिपोर्टमध्ये फ्रॅक्चर दिसून आले आहे आणि तो ६ आठवड्यांसाठी बाहेर आहे.
वेदनाशामक औषध घेतल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकेल की नाही याचा वैद्यकीय पथक शोध घेत आहे. त्याला अजूनही चालण्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि फलंदाजीला येण्याची त्याची शक्यता जवळजवळ शून्य दिसते.’ ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे आता इशान किशनला कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे. इशान सध्या नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे आणि त्याची कामगिरी चांगली झाली आहे.
भारताकडे सध्या ध्रुव जुरेलच्या रूपात कसोटी संघात यष्टीरक्षक आहे. तथापि, जर पंतची जागा घेतली गेली, तर त्याच्या अलीकडील कामगिरीचा विचार करता, ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी झारखंडच्या इशान किशनला संघात स्थान मिळू शकते. मँचेस्टरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात केली. साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले. ऋषभ पंत ३७ धावांवर चांगली फलंदाजी करत होता पण क्रिस वोक्सचा चेंडू त्याच्या पायावर लागला आणि त्यानंतर त्याला चालणे देखील कठीण झाले. दिवसअखेर भारताने ८३ षटकांत २६४ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर दोघेही १९ धावांवर फलंदाजी करत आहेत.