IND vs ENG : Start of 'Shubhman Era' of Indian Test Team; Sai Sudarshan's debut, Karun Nair's comeback
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले, लीड्स कसोटीला सुरवात झाली आहे. आजपासून दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी , इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी डवाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे.
भारतीय संघाबद्दल बोल्याचे झाल्यास साई सुदर्शनने इंग्लंडविरुद्ध कसोटीसामन्यात पदार्पण केले आहे. त्याला चेतेश्वर पुजाराकडून कसोटी कॅप देण्यात आली. तर, करुण नायरने तब्बल आठ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे. त्याच वेळी, शार्दुल ठाकूरला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. आयपीएल २०२५ मध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाचा देखील इंग्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडविरुद्ध टीम इंडियामध्ये चर्चेचा विषय ठरले आहे, ते म्हणजे करुण नायरचे सुमारे ८ वर्षांनी झालेले पुनरागमन. त्याने २०१७ मध्ये भारतीय संघाकडून आपला शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेरच राहिला होता. या मधल्या काळात त्याने टीम इंडियामध्ये परतण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. त्याने २०२४ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्याच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आणि त्याचे फळ करुणला इंग्लंड मालिकेदरम्यान मिळाले आहे. आता करुण नायर आपल्याला मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याच्या तयारीत आहे. तथापि, इंग्लंडविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात करुण नायरने इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावून आपले इरादे स्पष्ट केले होते.
#TeamIndia‘s Playing XI for the 1st Test 🙌
Sai Sudharsan makes his Test Debut 👏👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/r4UkgH2pZ4
— BCCI (@BCCI) June 20, 2025
साई सुदर्शनने आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम गाजवला आहे. या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला होता. त्याच वेळी, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. माजी अनुभवी खेळाडूंनी अनेकदा सांगितले आहे की सुदर्शनमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याचे गुण समाविष्ट आहेत. त्याच जोरावर त्याचे या सामन्यात कसोटी पदार्पण झाले आहे. हेडिंग्ले कसोटीत तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असल्याचे बोलले जात आहे.
Test Cap number 3⃣1⃣7⃣
Congratulations to Sai Sudharsan, who is all set to make his Test Debut 🙌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/wn8kaXdln6
— BCCI (@BCCI) June 20, 2025
सामन्याची स्थिती
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखले जाणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदनावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेकिचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहेत. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत २४ षटकांचा खेळ झाला असून यशस्वी जैस्वाल ३७ तर केएल राहुल ३८ धावांवर खेळत आहेत.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा