फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड T२० मालिका : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये २२ जानेवारीपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघामध्ये पाच T२० सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामान्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. या आधी भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध एकमेव मालिका खेळवली जाणार आहे. भारताच्या संघाची इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे यामध्ये काही धक्कादायक निर्णय बीसीसीआयने घेतले आहेत यावर एकदा नजर टाका.
भारत आणि इंग्लंड सोबतच्या ५ सामन्यांच्या T२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यासाठी सूर्यकुमारला कर्णधार आणि अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला होणार आहे. आज आम्ही तुम्हाला त्या ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे मागील T२० मालिकेत टीम इंडियाचा भाग होते पण यावेळी निवडकर्त्यांनी या तीन खेळाडूंकडे दुर्लक्ष केले आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण वास्तव त्यांच्या कामगिरीचे आहे.
टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला यावेळी इंग्लंडसोबतच्या टी-२० मालिकेत संधी मिळालेली नाही. यापूर्वी जितेश दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग होता, पण त्याची कामगिरी काही खास नव्हती, त्यामुळे निवडकर्त्यांनी यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. जितेशने टीम इंडियासाठी आतापर्यंत ९ टी-२० सामने खेळले आहेत. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून केवळ १०० धावा झाल्या.
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळालं स्थान
वेगवान गोलंदाज आवेश खानचीही इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. आवेश शेवटचा दक्षिण आफ्रिकेसोबत खेळलेल्या टी-२० मालिकेत खेळताना दिसला होता. ज्यामध्ये त्याने २ सामन्यात फक्त २ विकेट घेतल्या होत्या. आवेशने टीम इंडियासाठी आतापर्यंत २५ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये आवेशने गोलंदाजी करताना २७ विकेट्स घेतल्या आहेत.
२०२४ हे वर्ष यश दयाल यांच्यासाठी खूप चांगले होते. आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या चमकदार कामगिरीनंतर त्याला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधीही मिळाली. गेल्या वेळी यश दयाल दक्षिण आफ्रिकेसोबत खेळलेल्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग होता, मात्र यावेळी निवडकर्त्यांनी यशकडेही दुर्लक्ष केले आहे.
A look at the Suryakumar Yadav-led squad for the T20I series against England 🙌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nrEs1uWRos
— BCCI (@BCCI) January 11, 2025
भारताच्या संघ चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना १९ फेब्रुवारीला बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे.