
T20 World Cup 2026: 'This is one of the most dangerous teams...' Former captain MS Dhoni spoke frankly about India in the T20 World Cup...
MS Dhoni’s comments on the T20 World Cup 2026 : पुरुष टी-२० विश्वचषकाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवार होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संयुक्तपणे भारत आणि श्रीलंका हे देश करणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच देश कामाला लागले आहेत. अशातच, भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या संधीवर भाष्य केले आहे. त्याच्यामते दाबाव असणाऱ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी संघाकडे अनुभव, कौशल्य आणि संतुलन यांचे योग्य संयोजन असल्याचे म्हटले आहे.
एमएस धोनीने म्हणाला की, संघाची ताकद त्याचे खेळाडू दबावाच्या परिस्थिती किती चांगल्या प्रकारे हाताळतात आणि त्यांच्या भूमिका किती स्पष्टपणे परिभाषित ते करत असतात यावर अवलंबून असते. तसेच, तो म्हणाला की खेळाडू नेहमीच सामन्यासाठी तयारच असतात, फलंदाजी असो वा गोलंदाजी, ज्यामुळे भारताला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर चांगलाच फायदा मिळतो.
असे धोनीने एका कार्यक्रमाप्रसंगी सांगितले की, “हा सर्वात धोकादायक संघांपैकी एक आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यांनी आधीच फलंदाजी किंवा गोलंदाजी सुरू केली असेल. पण एका चांगल्या संघाला काय हवे असते? त्यांच्याकडे सर्वकाही हजर आहे. भारताकडे अनुभव आहे. विशेषतः जेव्हा या स्वरूपाचा विचार केला जातो तेव्हा भरपूर अनुभव असतो. त्यांनी दबावाखाली खेळ केला आहे. खेळाडू संघात कोणतीही भूमिका बजावत असले तरी, देखील ते बराच काळ त्या परिस्थितीत आहेत,”
धोनीने आशावाद व्यक्त केला आहे की, दव हा घटक पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अगदी काळजीपूर्वक आखलेल्या योजनांना देखील खराब करू शकतो. तो म्हणाला की दव खेळण्याच्या परिस्थितीवर लक्षणीय परिणाम करू शकतो आणि त्यासाठी नाणेफेकीचा कौल महत्त्वाचे ठरवू शकतो. ज्यामुळे सामन्यांमध्ये अन्याय्य फायदाही होण्याची शक्यता आहे.
धोनी पुढे म्हणतो की, “मला कशाची चिंता आहे? तर पुन्हा एकदा, मला दव हा घटक आवडत नाही. दव बऱ्याच गोष्टी बदलतो. म्हणून, जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा मला खरोखरच भीती वाटणारी एक गोष्ट म्हणजे दव. तसेच, नाणेफेक महत्त्वाची बनते. जर आपण काही सर्वोत्तम संघांविरुद्ध १० सामने खेळलो, तर परिस्थिती तटस्थ असल्यास आपण बहुतेक वेळा विजयी होण्याची शक्यता आहे. ”
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधाराने असे देखील निदर्शनास आणून दिले की टी-२० क्रिकेट अप्रत्याशित असून तिथे एक वाईट खेळ किंवा विरोधी संघाची उत्तम कामगिरी निकाल पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवते. “जेव्हा तुमचे काही खेळाडू चांगले खेळत नाहीत आणि विरोधी संघातील कोणीतरी उत्तम कामगिरी करत असतो, तेव्हा समस्या निर्माण होते. आणि टी-२० गट सामन्यांमध्येही असे घडू शकते. म्हणून, अशा वेळी तुम्हाला प्रार्थनांची गरज भासते.”