Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG, U19 World Cup Final Live! भारतच विश्वविजेता! अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी हरवून पटकावले जेतेपद

अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड १९ वर्षांखालील संघाचा १०० धावांनी पराभाव केला आणि विश्वविजेतेपद जिंकले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 08:30 PM
IND vs ENG, U19 World Cup Final Live! India are the world champions! They will clinch the title by defeating England by 100 runs in the final match.

IND vs ENG, U19 World Cup Final Live! India are the world champions! They will clinch the title by defeating England by 100 runs in the final match.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG U19 World Cup Final LIVE : अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर ९ गडी गमावून इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ ४०.२ षटकात ३११ धावांवरच गारद झाला आणि भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारताकडून आरएस अम्ब्रिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकरांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. तर कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. तसेच अभिज्ञान कुंडूने ४० धावांचे योगदान दिले. भारतीय फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडकडून जेम्स मिंटो सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, अॅलेक्स ग्रीन आणि सेबॅस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लुम्सडेनने १ विकेट घेतली.

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या इंग्लंड संघाची सुरवात चांगली झाली नाही. त्यांनी १९ धावांवरच जोसेफ मूर्सच्या रूपात आपला पहिला गडी गमावला. त्यांनंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी भारतीय गोलंदाजांवर काही काळ दाबाव आणण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ७४ धावांची भागीदारी रचली. परंतु, बेन मेयेस ४५ धावा करून बाद झाला. त्याला खिलन पटेलने बाद केले. त्यानंतर मात्र, इंग्लंड संघाची चांगलीच घसरगुंडी उडाली. १४२ धावांवर २ विकेट्स असताना इंग्लंडच्या १७४ धावांवर ७ विकेट्स गेल्या. बेन डॉकिन्सने अर्धशतक झळकवले आणि तो बाद झाला. त्याने ५६ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याला आयुष म्हात्रेने माघारी पाठवले.

A complete performance as India conquer the #U19WorldCup for a record 𝒔𝒊𝒙𝒕𝒉 time 🏆🇮🇳 📝: https://t.co/MNF3RNneSb pic.twitter.com/9q4dNI4ZYr — ICC (@ICC) February 6, 2026

इंग्लंड ३११ धावांवर गारद

त्यानंतर, थॉमस रीव्हज ३१ धावा, राल्फी अल्बर्ट ० धावा, फरहान अहमद १ धाव आणि सेबॅस्टियन मॉर्गन ० धावा, जेम्स मिंटो २८ धावा,  तर मॅनी लुम्सडेन ३ धावा काढून बाद झाले. तर कॅलेब फॉकनरने शतकी झुंज दिली खरी परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. त्याने ६७ चेंडूत ११५ धावा केल्या. त्याला कनिष्क चौहानने बाद केले आणि भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अॅलेक्स ग्रीन ० धावांवर नाबाद राहिला. भारताकडून आरएस अम्ब्रिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. खिलन पटेल आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन

भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

हेही वाचा : WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL

 

Web Title: Ind vs eng u19 world cup final live india will defeat england by 100 runs in the final match and clinch the championship title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • IND Vs END
  • india win
  • U19 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे, ज्यांच्या नेतृत्वात भारताने U19 World Cup वर कोरलं आपलं नाव
1

मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे, ज्यांच्या नेतृत्वात भारताने U19 World Cup वर कोरलं आपलं नाव

IND vs ENG : U19 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ 
2

IND vs ENG : U19 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ 

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी
3

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

 U19 World Cup Final: जेतेपदाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची धुव्वाधार खेळी! भारताचा इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर
4

 U19 World Cup Final: जेतेपदाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची धुव्वाधार खेळी! भारताचा इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.