फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लड दुसऱ्या सामन्याचा हवामानाचा अहवाल : पहिल्या सामन्यात घरच्या मैदानावर भारताने इंग्लंडला पराभूत करून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा संघ इंग्लडविरुद्ध पाच सामान्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडच्या विरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध या दोन मालिका खेळणार आहे.
भारत आणि इंग्लंडचे संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पोहोचले आहेत, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांच्या T२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जाईल. पहिल्या सामन्यात भारताने जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाचा सात विकेट्सने पराभव करून मालिकेत दमदार सुरुवात केली. संघाच्या विजयाचे कारण होते मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि सलामीवीर अभिषेक शर्मा यांनी शानदार खेळला दाखवला. आज दुसरा सामना होणार आहे त्यामुळे हवामानाचा अंदाज कोणाच्या दिशेने झुकला आहे यावर एकदा नजर टाका. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नईची हवामानाची स्थिती जाणून घ्या.
IND vs ENG : भारताचा तुफानी फलंदाज जखमी, दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली
Accuweather च्या वृत्तानुसार, एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान आल्हाददायक असेल. या काळात ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची अजिबात आशा नाही. दिवसभरात तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर किमान तापमान २२ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय या सामन्याचा आनंद घेता येईल, असे म्हणता येईल.
पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही फिरकीपटूंचे वर्चस्व अपेक्षित आहे. यामुळे सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीवर असतील जो कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारताच्या विजयाचे कारण ठरला होता. त्याने कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या, जिथे त्याने चार षटकात केवळ २३ धावा देत तीन विकेट घेतल्या होत्या.
जोस बटलरशिवाय उपकर्णधार अक्षर पटेलनेही चेंडूसह महत्त्वाचे योगदान दिले. त्याने इंग्लंडची खालची फळी उद्ध्वस्त केली आणि जेमी ओव्हरटन आणि गस ऍटकिन्सन यांच्या विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेत पाहुण्या संघाला १३२ धावांवर रोखले. इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलरने एकाकी झुंज देत ४४ चेंडूत ६८ धावांची तुफानी खेळी खेळली.
इंग्लंडने दिलेले १३३ धावांचे लक्ष्य गाठण्यात भारताला फारशी अडचण आली नाही, तिथे सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या युवा खेळाडूने ७९ धावा करत संघाला १२.५ षटकात लक्ष्य गाठण्यास मदत केली. त्याच्याशिवाय संजू सॅमसनने २० चेंडूत २६ धावांची खेळी केली.