Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: RO-KO ची जोडी पुन्हा दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! भारत-न्यूझीलंड पहिला वनडे कधी? कुठे पाहाल LIVE सामना?

IND vs NZ 1st ODI Schedule live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लवकरच एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तुम्ही हे सामने कधी, कुठे आणि केव्हा पाहू शकता, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 02:29 PM
IND vs NZ ODI series

IND vs NZ ODI series

Follow Us
Follow Us:
  • विराट-रोहित पुन्हा मैदानात
  • भारत-न्यूझीलंड पहिला वनडे सामना कधी
  • कुठे पाहाल LIVE अॅक्शन?
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिका संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका ३-२ ने जिंकली. आता दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. अवघ्या दोन दिवसांत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल. बऱ्याच कालावधीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा न्यूझीलंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील. रोहित आणि विराटच्या पुनरागमन सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, जाणून घेऊयात.

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी

पहिला वनडे सामना केव्हा आणि कुठे होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ ऑकलंडमधील ईडन पार्क मैदानावर आमनेसामने येतील. पहिला एकदिवसीय सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. भारत आणि न्यूझीलंडमधील टाईम झोनच्या फरकामुळे, हा सामना भारतात सकाळी प्रसारित केला जाईल.

दोन्ही संघांचे कर्णधार भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७:०० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील आणि सामना सकाळी ७:३० वाजता सुरू होईल.या क्रिकेट मैदानाची आसनक्षमता ४१,००० प्रेक्षकांची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना पाहण्यासाठी स्टेडियम पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

कुठे पाहाल हा सामना?

तुम्ही भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनल्सवर पाहू शकता. हा सामना सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपित केला जाईल. चाहते डीडी फ्री डिशवर उपलब्ध असलेल्या डीडी स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना मोफत पाहू शकतात. डीडी फ्री डिशसाठी कोणतेही मासिक किंवा रिचार्ज शुल्क नाही, त्यामुळेच हा सामना विनामूल्य स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

रोहित-विराट त्यांचा शेवटचा सामना कधी खेळले?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या मालिकेत विराट आणि रोहित दोघांनीही शानदार फलंदाजी केली. रोहितने तीन सामन्यांमध्ये २२५ धावा केल्या. या मालिकेत रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये १६८ धावा केल्या. कोहलीनेही या मालिकेत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, त्याने १३९ धावांची नाबाद खेळी करून एका ऐतिहासिक चेजमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

IND vs NZ: पहिल्यादांच असं घडलं! T20I मध्ये ‘सिक्सर किंग’ ठरली टीम इंडिया; भारताच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना कधी होणार?

    Ans: पहिला वनडे सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

  • Que: भारत आणि न्यूझीलंड पहिला वनडे सामना भारतात किती वाजता सुरू होईल?

    Ans: भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता सामना सुरू होईल.

  • Que: भारत-न्यूझीलंड सामना LIVE कुठे पाहता येईल?

    Ans: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि Sony LIV वर सामना पाहता येईल.

Web Title: Ind vs nz 1st odi auckland schedule live streaming where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • ODI Series
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11
1

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11

IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?
2

IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?

IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर
3

IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी
4

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.