
IND vs NZ
या सामन्यात, कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज दिग्गज रोहित शर्माची सलामीसाठी मैदानात उतरतील. या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. तर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. या मालिकेत कोहलीकडे अनेक रेकॉर्ड मोडण्याच्या संधी असतील. या तिघांनीही अलीकडे वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे या तिन्ही धुरंधुरांकडून मोठी अपेक्षा असेल.
टी-२० चा कर्णधार श्रेयस अय्यरला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, ऋतुराज गायकवाडला यावेळीही बाहेर बसावे लागू शकते. मधल्या फळीत केएल राहुल विकेटकीपर -फलंदाज म्हणून खेळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ईशान किशनला बेंचवर बसावे लागू शकते. नितीश कुमार रेड्डी देखील वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. त्याला साथ देण्यासाठी फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून नमन धीरचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
अक्षर पटेल हा प्रमुख फिरकी अष्टपैलू खेळाडू असेल. कुलदीप यादवलाही एकदिवसीय मालिकेसाठी संघाबाहेर ठेवले जाईल. अंशुल कंबोजलाही वेगवान गोलंदाजी विभागात आणखी एक संधी मिळू शकते. याशिवाय, अर्शदीप सिंगचे कमबॅक निश्चित दिसत आहे. मोहम्मद सिराज सध्या इंडिया ‘अ’ संघाकडून खेळत आहे, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणे त्याच्यासाठी अवघड आहे. यामुळे, सिराज केवळ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध असू शकतो. याशिवाय, संघ व्यवस्थापन गुरनूर ब्रारला आणखी एक संधी देण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.