
IND vs NZ 1st T20I: Abhishek Sharma's another remarkable feat! He surpassed Andre Russell to register 'this' record.
Abhishek Sharma breaks record in T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठून आपली छाप पाडली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात, अभिषेक शर्माने फक्त ३५ चेंडूत ८४ धावांची धुव्वाधार खेळी केली. त्याने टीम इंडियाला केवळ मजबूत स्थितीत आणले नाही तर टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा देखील गाठला. हा टप्पा गाठण्यासाठी अभिषेकला ८२ धावांची आवश्यकता होती, जी त्याने सहज गाठली.
हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माने रचला विक्रम! T20 मध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील ठरला पहिलाच फलंदाज
अभिषेक शर्माने १६९ सामन्यांपैकी फक्त १६५ डावातच ही किमया साधली आहे. त्याने सामना केलेल्या चेंडूंच्या बाबतीत एक नवीन विक्रम देखील आपल्या नावे केला आहे. कारण, अभिषेक शर्माने फक्त २,८९८ चेंडूत ५००० टी-२० धावा पूर्ण केल्या. यापूर्वी, हा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या नावावर जमा होता, ज्याने २,९४२ चेंडूंमध्ये ही कामगिरी बजावली होती.
या सामन्यात अभिषेकने ३५ चेंडूत ८४ धावांची स्फोटक खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ८ षटकार लगावले. या दरम्यान त्याने फक्त २२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विक्रम नोंदवत अव्वल स्थानी पोहचला आहे. अभिषेकने ही कामगिरी आठ वेळा करून दाखवली आहे. तर सूर्यकुमार यादव, फिल साल्ट आणि एविन लुईस यांनी प्रत्येकी सात वेळा हा पराक्रम केला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध एका टी-२० डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. अभिषेक शर्माच्या आधी वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्डने ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका टी-२० डावात ८ षटकार ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रिचर्ड लेव्ही या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये हॅमिल्टनमध्ये या संघाविरुद्ध १३ षटकार थोकण्याची किमया साधली होती. मारले होते.
पहिल्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून अभिषेक शर्माच्या ८४ धावा, रिंकू सिंगच्या नाबाद ४४ धावा, कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावा आणि हार्दिक पंड्याने २५ धावांच्या जोरावर भारताने ७ गडी गमावून २३८ धावा केल्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंडकहा संघ निर्धारित षटकात ७ गाडी गमावून १९० धावाच करू शकला. परिणामी, भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.