अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma made history in Nagpur : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली आहे, या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावून भारताने अभिषेक शर्माच्या ८४ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर २३८ धावा उभ्या केल्या. अभिषेक शर्माने या खेळीने इतिहास रचला आहे. या खेळी दरम्यान त्याने फक्त २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक मोठा टप्पा गाठला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २५ चेंडूंपेक्षा कमी वेळेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : नागपूरमध्ये अभिषेक-रिंकूची स्फोटक खेळी! न्यूझीलंडसमोर भारताचा 239 धावांचा डोंगर
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ८ षटकार लगावले. या खेळीमध्ये त्याने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ लगावले. यावेळी २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत अभिषेकचे हे आठवे अर्धशतक ठरले आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने सात वेळा ही किमया करणाऱ्या फिल साल्टला पिछाडीवर टाकले आहे.
हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार
न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी
भारत संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह






