
IND vs NZ 2nd ODI: KL Rahul's century makes his father-in-law happy! Sunil Shetty expressed his feelings, writing, 'I am proud of you...'
Sunil Shetty on KL Rahul’s century : भारत आणि न्युझीलंड यांच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना काल राजकोटमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने दिलेल्या २८४ धावांचा यशस्वी पाठलाग करत न्यूझीलंडने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संकटात सापडलेल्या भारताचा डाव केएल राहुल सांभाळत नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या शतकाचा आनंद त्याचे सासरे सुनील शिट्टीने देखील साजरा केला.
हेही वाचा : हरभजन सिंगने सूर्यकुमार यादवबद्दल केले मोठे विधान, सांगितले कधी करणार कर्णधार फलंदाजीतून पुनरागमन
राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, केएल राहुलने ९२ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १ षटकार लागवला. त्याची खेळी केवळ भारतासाठीच महत्त्वाची ठरली नाही तर त्याने त्याच्या टीकाकारांची तोंड बंद करण्यासाठी देखील महत्वाची ठरली. यावेळी राहुलची शानदार खेळी पाहून, सुनील शेट्टी देखील सोशल मीडियावर आपल्या जावयाचे कौतुक केले आहे.
सुनील शेट्टीकडून त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केएल राहुलच्या शतकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याने त्याच्यासोबत एक हृदयस्पर्शी कॅप्शन देखील लिहिले आहे. त्याने लिहिले की, “वेगळी स्थिती, तीच शांत दृष्टिकोन, तीच व्यक्तिरेखा. स्कोअरबोर्डला शतक आठवत असेल, पण त्यामागील शांतता मला नेहमीच आठवेल. तुझा अभिमान आहे बेटा.”
सुनील शेट्टीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने २०२३ मध्ये केएल राहुलसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नापासून, शेट्टी कुटुंब अनेक वेळा राहुलला पाठिंबा देताना दिसून आले आहे. मग ते मैदानावरील टीकेच्या वेळी असो किंवा चांगल्या खेळी वेळी असो.
हेही वाचा : ‘खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त…’, टास्क फोर्स प्रमुख पुलेला गोपीचंद
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. टॉस गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत केएल राहुलच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने डॅरिल मिशेलच्या नाबाद शतकाच्या जोरावर २८५ धावांचे लक्ष्य गाठून भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.