
IND vs NZ, 3rd ODI: After Mitchell, Glenn Phillips also hit a century in Indore! The Indian bowlers were left in disarray.
IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये सुरू आहे. सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. न्यूझीलंडकडूनचा संघ शानदार फलंदाजी करत असून डॅरिल मिचेलने आधी शतक झळकवले आणि त्याच्या पाठोपाठ ग्लेन फिलिप्सने देखील शतक झळकवले आहे. ग्लेन फिलिप्सने ८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ५३ धावांवर न्यूझीलंड संघाने आपले ३ गडी गमावले होते. डेव्हॉन कॉनवे ५ धावा करून माघारी गेला. तर हेन्री निकोल्सला भोपळाही फोडता आला नाही. विल यंग ३० धावा करून बाद झाला. त्यामुळे गिलचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरत असल्याचे चित्र होते. मात्र डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि डावाची सूत्रे हातात घेतली. या जोडीने भारतीय गोलंदाजांना एक देखील संधी न देता चौफेर फटकेबाजी करत २१९ धावांची रचली आहे.
दरम्यान, दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. नंतर हा जोर कायमच राखला. पुढे डॅरिल मिचेलने १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डॅरिल मिचेलचे या मालिकेत हे सलग दुसरे शतक ठोकले आहे. या आधी त्याने राजकोट येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ११७ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. डॅरिल मिचेल पाठोपाठ ग्लेन फिलिप्सने देखील ८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आता डॅरिल मिचेल १३२ धावांवर तर ग्लेन फिलिप्स १०६ धावांवर खेळत आहे. अजून ५ ओव्हर बाकी असून न्यूझीलंडच्या ३ बाद २८२ धावा झाल्या आहेत. ही जोडी अशीच खेळत राहिली तर न्यूझीलंड संघ ३५० धावांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. भारताकडून हर्षित राणाने २ तर अर्शदीप सिंगने १ विकेट घेतली आहे.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO
भारत खेळणारा इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क, जेडेन लेनोक्स.
बातमी अपडेट होत आहे…..