
IND vs NZ, 3rd ODI: India's 'run machine' Virat fires in Indore! 'King' Kohli scores a magnificent century; keeping the hopes of the Blue Army alive.
IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक झळकवले आहे.
विराट कोहलीने धावांचा पाठलाग करत ९२ चेंडूत शतक झळकवले आहे. या सामन्यात भारतासमोर ३०० प्लस टार्गेट असताना संघ अडचणीत आला होता. दिग्गज फलंदाज माघारी गेले होते. ७१ धावांवर भारताच्या ४ विकेट्स गेल्या होत्या. रोहित शर्मा ११ धावा करून बाद झाला. तर कर्णधार शुभमन गिलही २३ धावा करू शकला. उपकर्णधार श्रेयस अय्यर देखील झटपट ३ धावा करून बाद झाला. मागच्या सामन्यातील शतकवीर केएल राहुल १ धाव घेऊन पव्हेलियनमध्ये गेला. संघ अडचणीत असताना विराट कोहलीने नितीश कुमारच्या साथीने विराटने डाव सावरला. या दोघांनी ८८ धावा जोडल्या. नितीश ५७ चेंडूत ५३ धावा करून माघारी गेला. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याला ख्रिश्चन क्लार्कने बाद केले. रवींद्र जाडेजा १२ धावा करून माघारी गेला. एका बाजूने विकेट्स जात होत्या, त्यानंतरही विराट कोहली टिकून राहिला. त्याने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट हर्षित राणाला साथीला घेऊन डाव पुढे नेत आहे. विराट ११४ धावांवर खेळत आहे तर राणा ५२ धावा करून माघारी गेला आहे. भारताला ३९ चेंडूत ६१ धावांची गरज आहे.
CENTURY! A sensational 54th ODI 💯 from @imVkohli 🫡🫡 He is keeping India’s hopes alive in this chase.#TeamIndia #INDvNZ #3rdODI @IDFCfirstbank pic.twitter.com/LJkhKSpsVR — BCCI (@BCCI) January 18, 2026
भारत खेळणारा इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क.