
IND vs NZ, 3rd ODI: A 'Who are you?' situation in Team India! Kohli went his own way without even looking at coach Gambhir; Watch VIDEO.
Virat Kohli and Gautam Gambhir dispute : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघात सारे काही आलबेल नाही, अशी परिस्थिती या सामन्यापूर्वी दिसून आली. सामन्यापूर्वी टीम इंडियाकडून इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये जोरदार सराव करण्यात आला. तथापि, सराव सत्रादरम्यान विराट कोहली आणि संघाचा कोच गौतम गंभीर यांच्यातील एक दृश्य समोर आले ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोहली आणि गंभीर सराव दरम्यान एकमेकांशी संवाद न साधताच निघून गेले. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे, की गंभीर उपस्थित असून देखील कोहलीने त्याच्यापासून ठेवले आणि डोळ्यांशी संपर्क न साधता पुढे निघून गेला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, चाहत्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की संघात सर्व काही ठीक नसल्याचे चित्र आहे.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्याकडून यापूर्वी कोहली आणि गंभीर यांच्याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले होते. त्यांनी सांगितले की विराट कोहली आणि रोहित शर्मा पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसह भारताच्या दीर्घकालीन एकदिवसीय रणनीतीवर सक्रियपणे काम करत आहेत.
कोटक पुढे म्हणाले की, “मी बहुतेक वेळा उपस्थित असतो आणि जर मी त्यांना ऐकू शकलो तर ते त्यांचे अनुभव सांगत असतात. मी अनेकदा त्यांना एकमेकांशी संवाद साधत असताना पाहत असतो. त्यांच्याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू असते, जी मी पाहणे टाळतो. माझ्या मते, वातावरण खूपच सकारात्मक आहे.”
मागील काही महिन्यांपासून, कोहली, रोहित आणि नवीन प्रशिक्षक सेटअपमधील संबंधांबद्दल सतत अटकळी बाधल्या जात आहेत. कोटक असे देखील म्हणाले की, मार्चमध्ये टी-२० विश्वचषक संपल्यानंतर, भारताला त्यांच्या एकदिवसीय फलंदाजीवर पुनर्विचार करावा लागणार आहे. विशेषतः ३४ व्या षटकानंतर लागू होणाऱ्या नवीन चेंडू नियमाचा विचार समोर ठेवून.
Virat Kohli and Gautam Gambhir walked past each other but didn’t even look at one another – Is there really some issue going on between the two? 💔 After India’s win in the 1st ODI against New Zealand, only Rohit Sharma hugged Gambhir — Virat did not. pic.twitter.com/9RmBbZcBH1 — Jara (@JARA_Memer) January 17, 2026
त्यांनी असे स्पष्ट केले की बदललेल्या नियमांनुसार, गोलंदाजी संघ ३५ व्या आणि ५० व्या षटकांमधील दोन चेंडू निवडू शकतील. कोटक म्हणाले की, “टी-२० विश्वचषकानंतर एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढणार, ३४ व्या षटकानंतर फक्त एकच चेंडू वापरला जाणार आहे. त्यामुळे आम्हाला हा नवीन नियम लक्षात घेऊन आमची रणनीती आखावी लागणार आहे.”