Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 4th T20I : विषाखापट्टणममध्ये न्यूझीलंडचे जोरदार पुनरागमन! किवींकडून भारताचा 50 धावांनी पराभव 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला. भारत डाव १८.४ षटकातच गारद झाला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 28, 2026 | 10:47 PM
IND vs NZ 4th T20I : विषाखापट्टणममध्ये न्यूझीलंडचे जोरदार पुनरागमन! किवींकडून भारताचा 50 धावांनी पराभव 
Follow Us
Follow Us:

IND vs NZ 4th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे.या मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. टॉस गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य दिले होते, या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघ १८.४ षटकात १६५ धावाच करू शकला आणि परिणामी भारताला ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडकडून कर्णधार मिशेल सॅन्टनरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs NZ T-20 Series : ‘मला आदर मिळत नव्हता, अभिषेक मला स्वतःची…’ युवराज सिंगने केल्या भूतकाळाच्या आठवणी जाग्या

या समान्यापूर्वी भारताने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले . न्यूझीलंडकडून टिम सेफर्टच्या  ३६ चेंडूत ६२ धावा आणि  डेव्हॉन कॉनवेच्या २३ चेंडूत ४४ धावा, तसेच डॅरिल मिशेलच्या महत्वपूर्ण १८ चेंडूत नाबाद ३८ धावांच्या जोरावर ७ गडी गमावून २१५ धावा करून भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा भोपळा न फोडता बाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकूमार यादव देखील झटपट बाद झाला. तो ८ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर संजू  संजू सॅमसन आणि रिंकू सिंग,यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु,  संजू सॅमसन २४ धावा त्यानंतर हार्दिक पांड्या २ धावा करून बाद झाला. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी डाव सांभाळला परंतु,  रिंकू ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर दुबेने आक्रमक खेळी केली आणि भारताच्या आशा जीवंत ठेवल्या. त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले त्यानंतर तो २३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला.

New Zealand win the 4th T20I by 50 runs in Vizag.#TeamIndia lead the series 3⃣-1⃣ Scorecard ▶️ https://t.co/GVkrQKKyd6 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zkfXdvEwGD — BCCI (@BCCI) January 28, 2026

त्यानंतर हर्षित राणा ९ आणि अर्शदीप सिंग ० धावा करून बाद झाला. तसेच जसप्रीत बूमराह ४ धावा करून बाद झाला. तर कुलदीप यादव १ धाव करून बाद झाला तर रवी बिश्नोई १ धाव काढून नाबाद राहीला. परिणामी भारत १८.४ षटकात भारत १६५ धावा करून गारद झाला आणि न्यूझीलंड संघाने ५० धावांनी विजय मिळवला.  न्यूझीलंडकडून कर्णधार मिशेल सॅन्टनरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर ईश सोधी आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी २  विकेट्स घेतल्या. तसेच मॅट हेन्रीला १ विकेट मिळाली.

हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले

संघ पुढीलप्रमाणे आहेत:

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (डब्ल्यू), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सॅन्टनर (क), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

भारत प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

Web Title: Ind vs nz 4th t20i india defeated by new zealand by 50 runs in visakhapatnam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 10:45 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Mitchell Santner
  • Shivam Dube
  • T-20 Series

संबंधित बातम्या

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ
1

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
2

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
3

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
4

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.