पॉल स्टर्लिंगचा हिटमॅनला शोबी पछाड(फोटो-सोशल मीडिया)
Paul Stirling breaks Rohit Sharma’s world record : रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. रोहित शर्माच्या नावे टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार, सर्वाधिक शतकं तर कर्णधार म्हणून सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. पण आता रोहित शर्माचा एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आयर्लंडच्या ३५ वर्षीय खेळाडूने हा विश्वविक्रम मोडला आहे. हा ३५ वर्षीय खेळाडू आयर्लंडचा कर्णधार आहे. आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मागे टाकला आहे.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन मॅचविनर खेळाडू झाले T20 World Cup 2026 मधून बाहेर, निवडकर्त्यांनी केली घोषणा
युएईविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात खेळताच त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्त्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून दिल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विश्वचषक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही घोषणा केली होती. रोहित शर्माचा सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने २००७ मध्ये आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रोहितने त्याच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १५९ टी-२० सामने खेळले.
टी-२० कारकीर्दीतील १६० वा सामना आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यूएई विरुद्ध त्याच्या टी-२० कारकिर्दीतील १६० वा सामना खेळला. यासह, तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला. पण, स्टर्लिंग त्याचा ऐतिहासिक सामना आणखी खास करू शकला नाही आणि तो फक्त ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.






