
IND vs NZ 5th T20I: Sanju fails in Thiruvananthapuram, Ishan Kishan passes; scores a half-century off just 20 balls; Kiwi bowlers left helpless.
Ishan Kishan scores a half-century in Thiruvananthapuram : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजचा निर्णय घेतल आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज इशान किशनने २८ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. त्याने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारताची सुरुवात इतकी चांगली राहिली नाही. या सामन्यात संजू संजू सॅमसन ६ धावा करून बाद झाला. भारताची सुरुवात स्फोटक राहिली असली तरी तिसऱ्याच ओव्हरमध्ये संजू संजू सॅमसन ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. अभिषेक शर्मा १६ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. अभिषेक शर्माच्या विकेटनंतर इशान किशन मैदानात आला. त्याने सुरवातीपासून आक्रमक खेळ केला २८ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. या दरम्यान, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने ३० चेंडूत ६३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याला मिचेल सँटनरने बाद केले.
Making it count once again! ✨ Ishan Kishan with his 2⃣nd half-century of the series 👏 Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KqhNdZjU1c — BCCI (@BCCI) January 31, 2026
Trivandrum treated with a SKY special 🎇 FIFTY up for the #TeamIndia Captain 🫡 Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GfYMJXa8G0 — BCCI (@BCCI) January 31, 2026
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी