
IND vs NZ 5th T20I: Ishan Kishan's century blitz in Thiruvananthapuram! New Zealand's bowling attack was destroyed.
IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय योग्य ठरल्याचे दिसत आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज इशान किशनने शतक झळकवले आहे. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लाइन बिघडवत तूफान हल्लाबोल केला आहे. त्याने ४२ चेंडूत शतक पूर्ण केले.
हेही वाचा : IND vs NZ 5Th T20: ‘सूर्या’ पुन्हा तळपला! न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची तडाखेबंद खेळी
या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. भारताची सुरुवात स्फोटक राहिली असली तरी तिसऱ्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसन ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. अभिषेक शर्मा १६ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. अभिषेक शर्माच्या विकेटनंतर इशान किशन मैदानात आला. त्याने सुरवातीपासून आक्रमक खेळ केला.
त्याने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र त्याने चौथा गियर टाकला आणि किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. इशानने ४२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अखेर ४३ चेंडूत ६ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १०३ धावा करून तो बाद झाला. त्याला जेकब डफीने आपली शिकार बनवले. तथापी, सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावा काढून चांगली साथ दिली. सूर्यकुमारला मिचेल सँटनरने बाद केले. इशान बाद झाला तेव्हा भारताच्या १७.३ षटकात २३३ धावा झाल्या होत्या.
Maiden T20I HUNDRED! 💯 Ishan Kishan gets there with a MAXIMUM 🥳 He also completes 1000 T20I runs 🔥 Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sxtzixQIYq — BCCI (@BCCI) January 31, 2026
हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये संजू फेल, इशान किशन पास; 28 चेंडूत झळकवले अर्धशतक; किवी गोलंदाज बेजार
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी