एलेना रायबाकिना ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन(फोटो-सोशल मीडिया)
Elena Rybakina is the Australian Open champion : कझाकस्तानची २६ वर्षीय एलेना रायबाकिनाने मोठा कारनामा करून दाखवल आहे. एलेना रायबाकिना ऑस्ट्रेलियन ओपन महिला चॅम्पियन बनली आहे. पहिला सेट जिंकून रायबाकिनाने तिचा जुना पराक्रम कायम ठेवला आहे. रायबाकिनाने तीन सेटच्या संघर्षपूर्ण खेळ करत अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आणि माजी विश्वविजेत्या बेलारूसची आर्यना साबालेन्का हिला हरवून तिचे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
पहिला सेट जिंकल्यानंतर, रायबाकिनाने तिचा २४ वा सामना आपल्या नावे केला. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर, २०२३ आणि २०२४ ची विजेती आणि २०२५ ची अंतिम फेरी गाठणारी बेलारूसची आर्यना साबालेन्का हिला पहिल्या सेटमध्ये रायबाकिनाने ६-४ असा जबर धक्का दिला. या सेट विजयामुळे कझाकस्तानच्या रायबाकिनाला चांगलाच मानसिक फायदा झालेला दिसून येतो.
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सबालेंकाने दुसरा सेट ६-४ ने जिंकलाच नाही तर तिसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस ब्रेक करून ३-० अशी आघाडी देखील मिळवली. तथापि, रायबाकिनाने पुनरागमन अंतिम सामना ६-४ ने जिंकून तिच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. रायबाकिनाने यापूर्वी चार वर्षांपूर्वी विम्बल्डन जेतेपद जिंकले होते. तेव्हापासून, ती फक्त एकदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, २०२३ मध्ये.
कझाकस्तानच्या २६ वर्षीय रायबाकिनासाठी टेनिस प्रवास कठीण राहिला आहे. ती १५ वर्षांची होईपर्यंत, तिच्याकडे वैयक्तिक टेनिस प्रशिक्षक देखील उपलब्ध नव्हता, ती १८ वर्षांची होईपर्यंत, तिने इतर चार खेळाडूंसह एका गटात प्रशिक्षण घेतले होते. इतकेच नाही तर तिने खेळाडूंसाठी विशेष शाळा नव्हती म्हणून नियमित हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. तिच्या कारकिर्दीतील हे १२ वे मोठे विजेतेपद आहे. पण ऑस्ट्रेलियन ओपन विजयानंतर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, “मी माझ्या संघाचे आभार मानू इच्छिते. त्यांच्याशिवाय हा विजय शक्य झाला नसता. हे सर्व शक्य केल्याबद्दल मी माझ्या वैद्यकीय संघाचे आणि प्रायोजकांचे आभार मानू इच्छिते.”






