
IND vs NZ: 'King' Kohli follows in Sachin Tendulkar's unwanted footsteps! Virat falls victim to the 'nervous nineties' for the eighth time; read the details.
Virat Kohli’s nervous nineties : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने ९३ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने दिलेल्या ३०१ धावा भारताने सहज पूर्ण करून ४ विकेट्सने सामना जिंकला. या दरम्यान, विराट कोहलीला शतकाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनविरुद्ध मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना कोहली ९३ धावांवर बाद झाला.
विराट कोहली त्याचे ५४ वे वनडे शतक पूर्ण करू शकला नाही. त्याच्या बाद झाल्यामुळे वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. तो शतकाच्या इतक्या जवळ जाऊन बाद होईल असे कोणाला देखील वाटले नव्हते. मात्र, तो नर्व्हस नाइन्टीजमध्ये गेला.
हेही वाचा : …म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा
न्यूझीलंडने दिलेल्या ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने ३९ षटकांत २३४ धावा काढल्या होत्या. भारताला ६६ चेंडूत ६७ धावांची आवश्यकता होती आणि ८ विकेट शिल्लक होत्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर व्यवस्थित सेट झाले होते. कोहली त्याचे शतक पूर्ण करेल असे वाटत असताना तो नर्व्हस नाइन्टीजचा बळी ठरला. त्याने त्याच्या डावात ९१ चेंडूंचा सामना करत ९३ धावा केल्या यामध्ये त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला.
विराट कोहली त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत नर्व्हस नाइंटीजमध्ये बाद होण्याची ही आठवी वेळ ठरली आहे. यापूर्वी तो सहा वेळा ९० ते ९९ धावांच्या दरम्यान माघारी गेला होता. तर २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत तो बांगलादेशविरुद्ध ९६ धावांवर नाबाद राहिला होता.
वडोदरा येथे ९३ धावांनी बाद झाल्यानंतर तो नर्व्हस नाइंटीजमध्ये बाद होण्याची ही आठवी वेळ ठरली आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नर्व्हस नाइंटीजमध्ये सर्वाधिक बाद होण्याच्या बाबतीत तो आता जॅक कॅलिससह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नर्व्हस नाइंटीजमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे १८ वेळा बाद झाला आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ केन विल्यमसन, ग्रँट फ्लॉवर, नाथन अॅस्टल आणि अरविंद डी सिल्वा यांचा नंबर लागतो हे सर्व खेळाडू ९० ते ९९ दरम्यान प्रत्येकी नऊ वेळा माघारी गेले आहेत.