
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Washington Sundar ruled out of series against New Zealand due to injury : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला. तर दुसरा सामना सुरू होण्याआधी भारताच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाला आणखी एक नुकसान सहन करावे लागणार आहे. भारतीय संघातील अष्टपैलू वाॅशिग्टंन सुदंर याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले आहे.
सामन्यानंतर शुभमन गिलने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीबद्दल चर्चा केली. त्याने सांगितले की या स्टार अष्टपैलू खेळाडूला साईड स्ट्रेन आहे आणि त्याचे स्कॅनिंग केले जाईल. आता, दैनिक जागरणमधील एका वृत्तानुसार, वॉशिंग्टन सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचे स्कॅनिंग झाले आहे आणि त्याला बरगड्यांमध्ये वेदना होत आहेत. परिणामी, तो आता एकदिवसीय मालिकेत दिसणार नाही.
🚨 BIG BLOW FOR INDIA 🚨 Washington Sundar has been ruled out of the ODI series vs New Zealand. [Abhishek Tripathi] Earlier, Tilak Varma has been ruled out of the first 3 T20I vs New Zealand. T20 World Cup starts in February, lots of injury headaches for Gambhir. pic.twitter.com/VjhMHJsf1F — Johns. (@CricCrazyJohns) January 12, 2026
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत, वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जात आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही पर्याय देतो. त्याने वडोदरा एकदिवसीय सामन्यात पाच षटके टाकली पण त्याला एकही बळी मिळाला नाही, त्याने २७ धावा दिल्या. दुखापतीमुळे सुंदर लवकर फलंदाजीला आला नाही. त्याच्या आधी हर्षित राणाला पाठवण्यात आले. तथापि, राणा देखील बाद झाल्यावर, सुंदरला शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीसाठी यावे लागले. धावताना त्याला काही वेदना होत असल्याचे दिसून आले. तो सात चेंडूत सात धावा करून नाबाद राहिला.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी ऋषभ पंतला दुखापत झाली. सराव करताना त्याला अचानक पोटात वेदना जाणवू लागल्या. बीसीसीआयने पंतला स्नायूंचा ताण आल्याने तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले. पंतच्या जाण्यानंतर सुंदरलाही मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.