Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 1st ODI: रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय! पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात; विराट कोहलीची ९३ धावांची खेळी

IND vs NZ: लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४९ व्या षटकात षटकार मारुन विजय नोंदवला आणि मालिके १-० ने आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९३ धावा केल्या, तर शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 11, 2026 | 09:56 PM
रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय! (photo Credit- X)

रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय!
  • पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात
  • विराट कोहलीची ९३ धावांची खेळी
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंडमधील याच्यांतील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट राखून पराभव केला. त्याआधी नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावून ३०० धावा केल्या आणि भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४९ व्या षटकात षटकार मारुन विजय नोंदवला आणि मालिके १-० ने आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९३ धावा केल्या, तर शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले. २०२६ मधील भारताचा हा पहिला विजय आहे.
1ST ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/pX6HYz772x #TeamIndia #INDvNZ #1stODI @IDFCfirstbank — BCCI (@BCCI) January 11, 2026

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळाली. डेव्हॉन कॉनवे (६७ चेंडूत ५६) आणि हेन्री निकोल्स (६९ चेंडूत ६२) यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. विल यंग (१२) आणि ग्लेन फिलिप्स (१२) स्वस्तात बाद झाले. कर्णधार मायकेल ब्रेसवेल १६ धावांवर धावबाद झाला. तथापि, चौथ्या क्रमांकावर आलेल्या डॅरिलने दुसऱ्या टोकाला ठामपणे धरले. त्याने ब्रेसवेलसोबत सहाव्या विकेटसाठी ३९ धावा आणि ख्रिश्चन क्लार्क (नाबाद २४) यांच्यासोबत सातव्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. काइल जेमिसन ८ धावांवर नाबाद राहिला. झाचेरी फौल्क्सने १ धाव केली. भारताकडून हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ तर कुलदीप यादवने १ विकेट घेतली.

IND vs NZ: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावांचा डोंगर, सचिन-संगाकाराचा रेकॉर्ड तोडला

हर्षित राणा यांनी महत्त्वपूर्ण खेळी

भारत आणि न्यूझीलंडमधील सामना ४९ व्या षटकात गेला. एका क्षणी भारताचा विजय अटळ वाटत होता आणि कोहली शतक ठोकून संघाला विजयाकडे घेऊन जाईल हे निश्चित वाटत होते. तथापि, ४० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर काइल जेमिसनने कोहलीला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ४२ व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला, ज्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. अय्यरच्या जाण्यानंतर वेगवान गोलंदाज हर्षित राणा मैदानात आला. राणाने २९ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर केएल राहुलने वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून ४९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारताला ४ गडी राखून विजय मिळवून दिला. केएल २९ धावांवर नाबाद राहिला.

भारतीय संघाची प्लेइंग ११

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, वाॅशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा

न्यूझीलंड संघाची प्लेइंग ११

डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक फॉक्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, आदित्य अशोक

Rohit Sharma Record: ‘हिटमॅन’चा जगात डंका! ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत केला असा ‘भीमपराक्रम’, जो आजवर कुणालाच जमला नाही

Web Title: India defeated new zealand by 4 wickets in the first odi virat kohli played an innings of 93 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Rohit Sharma
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
1

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
2

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
3

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे
4

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.